Sat, Aug 08, 2020 12:28होमपेज › National › टिकटॉक बंदीचा झटका; चिनी कंपनीचे ४५ हजार कोटींचे नुकसान!

टिकटॉक बंदी; 'या' कंपनीचे ४५ हजार कोटींचे नुकसान!

Last Updated: Jul 04 2020 10:17AM

file photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये लोकप्रिय टिकटॉक अ‍ॅपचा समावेश आहे. भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यामुळे या ॲपची मूळ कंपनी बाईट डान्सला कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने टिकटॉक बंदीमुळे बाईट डान्स कंपनीचे ४५ हजार कोटींहून अधिक रुपयांचे अधिक नुकसान झाल्याचे म्हटले आहे. हॅलो आणि टिकटॉकवरील बंदीमुळे संबंधित कंपनीच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार असल्याचे नमूद केले आहे.

वाचा : बिग ब्रेकिंग : टिकटॉक, यूसी ब्राऊझरसह चीन्यांच्या ५९ ॲपवर केंद्र सरकारकडून बंदी!

एका अहवालानुसार, चीन बाहेर भारत टिकटॉकसाठी मोठे मार्केट आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम चिनी ट्रेडर्स आणि व्यवसायावर दिसून येणार आहे. भारताच्या या निर्णयामुळे चिनी गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असल्याचा सूर चीनकडून व्यक्त होत आहे. 

टिकटॉक भारतात वेगाने लोकप्रिय झाले होते. हे ॲप लाँच झाल्यानंतर भारतात गूगल प्ले स्टोअरमधून टिकटॉक सुमारे ६६ कोटी वेळा डाउनलोड करण्यात आले होते. सध्या हे ॲप प्ले स्टोअरमधून हटविण्यात आले आहे. यामुळे याचा ॲक्सेस आता मिळणार नाही.

भारत सरकारने चीनच्या ५९ ॲपवर बंदी घातली असून १ जुलैपासून ॲप बंदीचा हा निर्णय लागू झाला आहे. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनने मागील १५ तारखेला दगाबाजी करून भारताचे २० सैनिक मारले होते. त्याचा बदला घेण्याचा एक भाग म्हणून चिनी ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. 

वाचा : टिकटॉक बंदीनंतर 'तो' म्हणाला, 'माझ्या दोन्ही बायका लय रडल्या' 

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने आयटी कायद्याच्या कलम ६९ ए अन्वये ५९ चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे. देशाची सार्वभौमता, एकता आणि संरक्षणासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असल्याचे मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे. 

ज्या ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात भारतभर लोकप्रिय असलेल्या टिकटॉक, युसी ब्राऊझर, शेअरइट या ऍप्सचा समावेश आहे. याशिवाय क्वाय, बैदू मॅप, सीईन, क्लश्य ऑफ किंग्ज, डीयु बॅटरी सेव्हर, हेलो, लायकी, यु कॅम मेकअप, एमआय कम्युनीटी, सीएम ब्राउझर, वायरस क्लीनर, अपूस ब्राउझर, रोमवूई, क्लब फॅक्टरी,न्युज डॉग, ब्युट्राय प्लस, वूई चाट, युसी न्युज, क्यूक्यू मेल, वूइबो, झेंडर, क्यूक्यू मूझीक, क्यूक्यू न्युजफीड, बिगो लाईव्ह, सेल्फी सिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस, एमआय व्हिडिओ कॉल, वूई सिंक, ईएस फाईल ईक्सप्लोरर, विवा व्हिडिओ, मैतू, वीगो व्हिडिओ, न्यू व्हिडिओ स्टेटस, डीयू रेकोर्डर या ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. 

याशिवाय वोल्ट हाईड, कॅचे क्लिनर, डीयु क्लिनर, डीयु ब्राउझर, हगो प्ले, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर-चिता मोबाइल, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, वूई मीट, स्वीट सेल्फी, बैदु ट्रान्सलेट, व्ही मेट, क्यूक्यू इंटरनॅशनल, क्यूक्यू सेक्युरिटी सेन्टर, क्यूक्यू लाँचर, यू व्हिडिओ, व्ही फ्लाय, मोबाईल लेजेंड आणि डीयू प्रायव्हसी या ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे.