Sun, Aug 09, 2020 13:54होमपेज › National › हिरो सायकल कंपनीकडून चीनसोबतचा तब्बल ९०० कोटींचा करार रद्द!

हिरो सायकल कंपनीकडून चीनसोबतचा तब्बल ९०० कोटींचा करार रद्द!

Last Updated: Jul 04 2020 5:14PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

चीनचे सैन्य सीमेवर कुरापती चालूच आहेत. चीनी सैन्य व भारतीय सैन्य यांच्यात संघर्षही झाला आहे. यात २० भारतीय जवान शहीद झाले. तेव्हापासून देशात चीनी वस्तूंना विरोध होत आहे. देशात चीनी वस्तूंवर आता बहिष्कार घालण्यात आला आहे. केंद्र सरकारने ५९ चीनी ॲपना बंदी घातली. आता देशातील कंपन्या चीनसोबतचे सर्व करार रद्द करत आहेत. हिरो सायकलने आता ९०० कोटींचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.    

वाचा : 'मेड इन इंडिया अंतर्गत व्हेंटिलेटर्सचा पुरवठा'

हिरो सायकलने सरकारला १०० कोटींची देणगी दिली आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता त्यामुळे कंपन्या बंद होत्या. कंपन्यांचे नूकसान झाले आहे. पण या काळातही हिरो सायकल कंपनीने प्रगती केली आहे. हिरो सायकलने चीनवर बहिष्कार टाकत, ९०० कोटींचा व्यवसाय रद्द केला आहे. जो येत्या ३ महिन्यांत होणार होता. दुसरीकडे, हिरो कंपनी लुधियानामधील छोट्या सायकली तयार करणार्‍यांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे आणि त्यांना विलीन करण्याची ऑफर देत आहे.

हिरो सायकलने चीनशी सर्व प्रकारचे व्यापार बंद केले आहेत. हिरो सायकल आता जर्मनीमध्ये एक प्लांन्ट उभा करण्याच्या तयारीत आहे. जर्मनीतील या प्लॅन्टमधून हिरो सायकलचा पुरवठा संपूर्ण युरोपमध्ये केला जाईल. हिरो सायकलची मागणी खूप वाढली आहे. 

वाचा : चीन्यांची ॲप बंद करताच पीएम मोदींनी दिले नवे चॅलेंज!