Thu, Oct 29, 2020 07:20होमपेज › National › हाथरस प्रकरणाची केस निर्भयाची वकील सीमा कुशवाह लढणार? 

हाथरस प्रकरणाची केस निर्भयाची वकील सीमा कुशवाह लढणार? 

Last Updated: Oct 01 2020 4:36PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणाची केस निर्भयाला न्याय मिळवून देणाऱ्या सीमा कुशवाह लढणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, अद्याप याबाबत पुष्टी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा हाथरस प्रकरणाची केस फी न घेता लढणार आहेत. त्या शुक्रवारी हाथरस येथे जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतील, अशीही चर्चा सुरू आहे.

देशाला हादरवून टाकणाऱ्या हाथरस गँगरेप प्रकरणाचा तपास करणाऱ्या यूपी SIT ची टीम हाथरस येथे पोहोचली आहे. तीन सदस्यीय या टीममध्ये महिला अधिकारीदेखील आहेत. मानवाधिकार आयोगाने या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांना नोटिस दिली आहे.

सात दिवसांत रिपोर्ट देणार SIT

एसआयटीला सात दिवसांच्या आत आपला रिपोर्ट सादर करायचा आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल. 

निर्भयाला न्याय मिळवून देण्यात आणि दोषींना फाशी देण्यात सुप्रीम कोर्टाच्या वकील सीमा कुशवाहा यांची मोठी भूमिका होती. त्या निर्भया केसच्या सुरुवातीपासूनच निर्भयाच्या आई-वडिलांची वकील  म्हणून काम पाहत होत्या. अखेर निर्भयाच्या दोषींना २० मार्च रोजी सकाळी फाशी झाली होती. 
 

 "