Thu, Nov 26, 2020 21:09होमपेज › National › गेल्या पाच आठवड्यात कोरोनाचा दिलासा, पण 'या' पाच राज्यांची चिंता कायम!

गेल्या पाच आठवड्यात कोरोनाचा दिलासा, पण 'या' पाच राज्यांची चिंता कायम!

Last Updated: Oct 28 2020 10:33AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतात कोरोना रुग्णांची संख्या ८० लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. आतापर्यंत ७२ लाख रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांची ही संख्या जगभरात सर्वाधिक आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, रिकव्हरी रेट ९० टक्क्यांहून अधिक आहे. मागील १३ दिवसांत १० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी म्हटले आहे की, पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घसरण पाहायला मिळाली. आता याची टक्केवारी ७.६१ टक्के आहे.  भारतात कोरोना मृत्‍यूदर १.५० टक्के आहे. मागील ५ आठवड्यांपासून रोजच्या रुग्ण संख्येत आणि मृत्यू संख्‍येत घसरण होत आहे. पण, असे असले तरी अद्याप कोरोनाचे टेन्शन आहे.

पुढील १० राज्यांतील कोरोनाची स्थिती काय आहे, पाहुया. 

मंगळवारी ४५ हजारांहून कमी रुग्ण 

मंगळवारी दि. २७ रोजी कोरोनाच्या ४२ हजार ७०४ रुग्णांची नोंद झाली आहे. ही २१ जुलैनंतरचा सर्वात कमी संख्या होती. तेव्हा ३८ हजार ४४४ पॉझिटिव्ह रुग्ण होते. सोमवारी १०१ दिवसांत सर्वात कमी नवे रुग्ण आढळले होते. 

या ५ राज्यांमध्ये टेन्शन

देशात पाच राज्‍यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर टेन्शन देणारा आहे. सोमवार दि. २६ रोजी जे नवे रुग्ण समोर आले आहेत, त्यापैकी जवळपास ५० टक्के रुग्ण केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्‍ट्र, कर्नाटक आणि दिल्‍ली या ५ राज्यातील आहेत. देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ६.२५ लाख आहे. यातील जवळपास ३५ टक्के रुग्ण १८ जिल्ह्यातून आहेत. 

१० राज्‍यांमध्ये ७८ टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्ण 

वरील पाच राज्यांशिवाय तामिळनाडी, आंध्र प्रदेश, उत्‍तर प्रदेश, छत्‍तीसगढ आणि तेलंगानामध्ये देशात सर्वात अधिक सक्रीय रुग्ण आहेत.

मागील आठवड्यात डेली केसेसमध्ये घसरण 

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २३ आणि २९ सप्टेंबर दरम्यान, डेली केसेस ८३ हजार २३२ होते. जे २१ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबरपर्यंत घट होऊन ४९ हजार ९०९ झाली आहे. कोरोना चाचण्या कमी केल्यामुळे आकडेवारी नाही तर रोज जवळपास ११ लाख कोरोना चाचण्या झाल्या होत्या. सोमवार दि. २६ रोजी ३६ हजार ४७० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. हा १७ जुलैपेक्षा सर्वात कमी आकडा आहे. 

मृत्यूसंख्येत घट 

जगभरातील ज्या-ज्या देशात मृतांची संख्या कमी आहे, त्यामध्ये भारतदेखील समाविष्ट झाला आहे. भारतात प्रति १० लाख लोकसंख्येच्या केसेसची संख्‍या ५ हजार ७५८ आहे. तर जगात ५ हजार ५०४ आहे.केंद्र सरकारने २२ जूनपासून देशात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमधून बाहेर आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती. प्रत्येक  महिन्याला काही नियम हटवले जात होते. आता यावेळी गृह मंत्रालयाकडून नवी गाईडलाईन्स येणार नाहीत. केंद्राने ३० सप्टेंबरला ते ३१ ऑक्‍टोबरपर्यंतसाठी ज्या गाईडलाईन्स तयार केल्या होत्या, त्याचे पालन ३० नोव्हेंबरपर्यंत केले जाईल.