Thu, Jan 28, 2021 03:45
शेतकरी आंदोलन : आंदोलकांनी जाळल्या शेती सुधारणा कायद्याच्या प्रती

Last Updated: Jan 13 2021 7:10PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

शेती सुधारणा कायद्याविरोधात कडाक्याच्या थंडीत ४९ व्या दिवशी ही राजधानी दिल्लीत शेतक-यांचे आंदोलन सुरूच आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही शेती सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली असली तरी, शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान, लोहडी उत्सवाचे औचित्य साधत सिंघु सीमेवर आंदोलक शेतक-यांनी शेती सुधारणा कायद्याच्या प्रती जाळून निषेध व्यक्त केला.लोहडी निमित्ती दिल्लीतील वेगवेगळ्या सीमेवार आंदोलन करणा-या शेतक-यांनी शेती सुधारणा कायद्याच्या प्रती जाळून लोहडी साजरी केली.

सैन्य भर्तीची वाट पाहत आहात का? बातमी आपल्यासाठी!

१५ जानेवारीला सरकार सोबत होणार्या चर्चेच्या ९व्या फेरीत सहभागी होणार असल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात आले आहे. संयुक्त किसान मोर्चाकडून घोषित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कुठलाही बदल करण्यात आलेला नसल्याचे शेतकरी नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. १८ जानेवारीला आंदोलकांकडून महिला शेतकरी दिवस साजरा केला जाईल. २० जानेवारील गुरु गोविंद सिंह यांना अभिवादन करीत शपथ घेतली जाईल. २३ जानेवारीला आझाद हिंद किसान दिवसानिमित्त संपूर्ण देशातील राजभवनावर घेराव करण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे.

अंगणवाडी सुरु करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

अन् घोडयासोबत युवक पोहोचला आंदोलनस्थळी 

२६ जानेवारीला दिल्लीच्या दिशेने कूच करण्यासाठी शेती सुधारणा कायद्या विरोधात पंजाब मधील लखेवाला डाल येथील सुशील कुमार यांनी घोड्यासह युपी गेट येथील आंदोलन स्थळ गाठले आहे. प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आपल्या १० घोड्यासह शेतकऱ्यांसोबत ते राजधानीच्या दिशेने कूच करणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयचे केंद्रीय कृषीराज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी स्वागत केले आहे. येत्या काळात समिती निष्पक्ष रित्या निर्णय देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. समिती शेतकरी संघात, कृषी तज्ज्ञ यांच्या सूचना, सल्ला घेत निर्णय देईल ल, असेही ते म्हणाले.शेती संबंधी जुने कायदे चांगले होते तर गरीब शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती. सदर कायद्यामध्ये वाटल्यास भविष्यात सुधारणा केली जाऊ शकते, असेही चौधरी म्हणाले.

पेट्रोल, डिझेलची शंभरीकडे दमदार वाटचाल!

१८ जानेवारीला महिला किसान दिवस

आंदोलक शेतकरी १८ जानेवारीला युपी गेट वर महिला किसान दिवस साजरा करणार आहेत. या दिवशी आंदोलनाच्या व्यासपीठाची जवाबदारी महिला शेतकऱ्यांच्या हाथी दिली जाईल. १७ जानेवारी पासून महिला शेतकरी आंदोलन स्थळी पोहोचतील. त्यांच्या निवासाची व्यवस्थेकरीता कॅम्प तयार केले जात आहे. महिला स्वयंसेवकांना त्यासाठी तैनात केले जात असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.

हरियाणात सरकार वाचवण्यासाठी भाजपची पळापळ, दुष्यंत चौटालांची मोदींशी चर्चा