Tue, Sep 29, 2020 08:50होमपेज › National › उन्नाव बलात्कार प्रकरण; निलंबित भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी

उन्नाव बलात्कार प्रकरण; निलंबित भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी

Last Updated: Dec 16 2019 3:30PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

क्रौर्याची परीसीमा गाठलेल्या उन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून निलंबित भाजप आमदार कुलदीप सेंगरला दोषी ठरवण्यात आले. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे २०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता.

या प्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीपसिंह सेंगर याच्यावर अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या गाडीवर ट्रक घालून तिला संपवण्याचा प्रयत्न भाजप आमदार कुलदीप सेंगरकडून करण्यात आला होता. येत्या १९ डिसेंबरला शिक्षेची सुनावणी होणार आहे. 

न्यायालयाकडून सहआरोपी शशी सिंह याची निर्दाष मुक्तता करण्यात आली आहे. पीडिताला सेंगर याच्याकडे घेऊन गेल्याचा शशी सिंह याच्यावर आरोप होता. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हा खटला लखनौ येथील कोर्टातून दिल्ली कोर्टात वर्ग करण्यात आला. त्यानंतर ५ ऑगस्टपासून या खटल्याची रोज सुनावणी सुरु होती.  

 "