Sun, Sep 20, 2020 09:13होमपेज › National › आठ जूननंतर उघडणार हॉटेल्स, एंट्री करतेवेळी भरावा लागणार फाॅर्म   

आठ जूननंतर उघडणार हॉटेल्स, एंट्री करतेवेळी भरावा लागणार फाॅर्म   

Last Updated: Jun 06 2020 4:37PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे २ महिन्यांहून अधिक काळ बंद असलेला हॉटेल व्यवसाय ८ जूनपासून सुरु होणार आहे. सध्या कंटेनमेंट झोनमध्ये प्रतिबंध कायम आहेत. सरकारने अनलॉक करण्याच्या पहिल्या टप्प्यात हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या सवलतीत सरकारने ग्राहक आणि हॉटेलसाठी काही अटी आणि शर्ती घातल्या आहेत. या नियमांनुसार आता हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी एक नोंदणी फॉर्म भरावा लागणार आहे. 

वाचा : टीक टॉक स्टार भाजप महिला नेत्याची पोलिस अधिकाऱ्यांसमोरच सचिवाला चप्पलने मारहाण!

हॉटेल्सच्या रिसेप्शनमधील फार्ममध्ये ग्राहकांना त्यांच्या प्रवासाची माहिती आणि वैयक्तीक माहिती भरावी लागणार आहे. ही माहिती हॉटेल्स व्यवस्थापनाच्या तपासणासाठी असेल. तसेच ग्राहकांना ऑनलाइन फॉर्म, ऑनलाइन पेमेंटचे क्यूआर कोड वापरावे लागतील. यानुसार ग्राहकांना जेवणाची सोय होणार आहे. तसेच यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार आहे.  

वाचा : आठ जूननंतर उघडणार हॉटेल्स, एंट्री करतेवेळी भरावा लागणार फार्म   

यापूर्वी सरकारने रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी दिली होती. पण त्यामध्ये ग्राहकांना बसण्याची आणि जेवण्याची परवानगी दिलेली नाही. रेस्टॉरंटमधून फक्त होम डिलीवरीची सोय करण्यात येते. कोरोना व्हायरसमुळे देश लॉकडाऊन झाल्यानंतर आता हळूहळू सर्व दुकाने उघडत आहेत. तसेच धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे आणि अन्य आदिरातिथ्य सेवा, शॉपिंग मॉल्स ८ जून नंतर खुले केले जाणार आहे. 
 

 "