Wed, Aug 12, 2020 00:37होमपेज › National › 'इंदिरा गांधी लेहला गेल्या, तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते, बघुया मोदी काय करतात'

'इंदिरा गांधी लेहला गेल्या तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते, बघुया मोदी काय करतात'

Last Updated: Jul 03 2020 3:50PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लडाख दौर्‍यावर काँग्रेसने कडक शब्दात टोला लगावला आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी ट्विटरवर इंदिरा गांधी यांच्या लेह दौर्‍याचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसह लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय करतात ते पाहूया. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैनिक यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट चीनला संदेश देणारी म्हणून पाहिली जात आहे. शुक्रवारी सकाळी अचानक मोदी लडाखमध्ये दाखल झाले.

अधिक वाचा : विस्तारवादाचं युग संपलंय; पंतप्रधान मोदींचा लडाखमधून चीनला इशारा

Image

अधिक वाचा : पीएम मोदींचा लडाख दौऱ्यातून चीनला कठोर संदेश

इंदिरा गांधी यांनी लेहचा दौरा करून सैन्य दलाला संबोधित केले होते. मनीष तिवारी यांनी त्या छायाचित्रासह लिहिले आहे की, 'जेव्हा त्या (इंदिरा) लेहला गेल्या तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. बघुया ते (मोदी) काय करतात? इंदिरा गांधी यांचे ते छायाचित्र १९७१ च्या युद्धापूर्वीचे आहे. या युद्धानंतर पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि बांगलादेशचा जन्म झाला.

अधिक वाचा : भारत-चीन सीमेवर तणाव असताना पंतप्रधान मोदी अचानक पोहोचले लडाखमध्ये!