Wed, Oct 28, 2020 10:37होमपेज › National › तैवानवर कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची चीनची तयारी

तैवानवर कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची चीनची तयारी

Last Updated: Oct 19 2020 1:22AM
बीजिंग : वृत्तसंस्था

चीनने गुआंगडोंग राज्यातील सैन्यतळावर डीएफ-17 क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. या तळावर गेल्या दशकापासून अन्य क्षेपणास्त्रे तैनात होती. उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांतून चीनने गुआंगडोंग व फुजियानच्या तळांवर लष्करी सुविधांमध्ये कमालीची वाढ केली आहे. सैन्यसंख्याही वाढवली आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 5 दिवसांपूर्वीच कोणत्याही क्षणी युद्धासाठी सज्ज राहा, असे आवाहन सैनिकांना उद्देशून केले होते. वरील दोन्ही गोष्टींवरून चीन कुठल्याही क्षणी तैवानवर हल्ला करू शकते, असे मानले जात आहे.

तैवानला लागून असलेल्या समुद्री किनार्‍यांवर चीनने नौसैनिकांची संख्या वाढवणे सुरू केले आहे. येथून जुन्या बनावटीच्या डीएफ-11 आणि डीएफ-15 क्षेपणास्त्रांना हटविले जात आहे. त्याऐवजी अद्ययावत   सुपरसॉनिक डीएफ-17 क्षेपणास्त्रे तैनात केली जात आहेत. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता अधिक दूरवर आहे. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने संरक्षण विशेषज्ञांच्या हवाल्याने आक्रमणाची अप्रत्यक्ष पुष्टी करणारे एक वृत्तही प्रकाशित केले आहे. दुसरीकडे, कॅनडातील ‘कान्वा डिफेन्स रिव्ह्यू’ने आपल्याकडे चीनच्या तैवानवरील आक्रमणाची योजना उघड करणारी उपग्रह छायाचित्रे असल्याचा दावाही केला आहे.दरम्यान, अमेरिकेने तैवानला उघडउघड पाठिंबा दिला आहे. 

 "