पश्चिम बंगाल : पुढारी ऑनलाईन
महिलांसोबत होणाऱ्या अत्याचारांच्या अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रसिद्ध केक तयार करणाऱ्या कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने महिलांना ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्याचा गुन्हा इतका गंभीर आहे की, महिला त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हुगली जिल्ह्यातील प्रसिद्ध केक कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने प्रसिद्ध कंपनीच्या उत्पादनांबाबत फीडबॅक जाणून घेण्याच्या बहाण्याने तो महिलांना व्हिडिओ कॉल करत होता. फीडबॅकच्या नावावर व्हिडिओ कॉल करतेवेळी महिलांचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवत होता. त्यानंतर महिलांना ब्लॅकमेल करत होता. ब्लॅकमेल केल्यानंतर तो त्या महिलांना शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुगलीतील क्योटामधील त्रिकोण पार्कमध्ये राहणारा तरूण विशाल शर्मा याने ६६ महिलांना ब्लॅकमेल केले. त्यामुळे त्याच्यावर बलात्कार केल्याचे अनेक आरोप आहेत. याप्रकरणी चंदननगर कमिश्नरेटच्या अंतर्गत चुचुडा पोलिस स्टेशनमध्ये विशाल शर्मा आणि त्याचा एक साथीदार सुमन मंडल यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे.
या प्रकणात आरोपीच्या आईची चौकशी केली असता आरोपी विशाल शर्माच्या आईनेही आपल्या मुलाचा गुन्हा मान्य केला आहे. त्यानंतर त्याच्या या प्रकणात ती सहभागी असल्याचा आरोप तिने मान्य केला आहे. आता विशाल आणि त्याचा साथिदार सुमन मंडल याच्यावर पोलिसांनी वेगवेगळ्या केसेस दाखल केल्या आहेत.