Sun, Sep 20, 2020 09:42होमपेज › National › कोरोनाविरुद्धची लढाई कमजोर करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न : भाजप 

कोरोनाविरुद्धची लढाई कमजोर करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न : भाजप 

Last Updated: May 27 2020 3:42PM

भाजप नेते व कायदा मंत्री रविशंकर प्रसादनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊन वाया गेल्याचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे म्हणणे साफ चुकीचे असून ते केवळ खोटेपणा फैलावत असल्याचा आरोप भाजप नेते व कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. 

देशातील 15 आघाडीच्या देशांची लोकसंख्या 142 कोटी आहे. तर भारताची लोकसंख्या 137 कोटी आहे. 15 देशांमध्ये 3 लाख 43 हजार लोक कोरोनामुळे मरण पावले आहेत. तर दुसरीकडे आपल्या देशात मृतांची संख्या चार हजाराच्या आसपास आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी खोटेपणा फैलावत असल्याचे स्पष्ट होते, असे सांगून प्रसाद पुढे म्हणाले की, कोरोनावर अजून औषध आलेले नाही, अशावेळी लॉकडाऊन हाच विषाणू रोखण्याचा उपाय आहे. राहुल गांधी देशाची एकता तोडत असलेल्याना धन्यवाद देत आहेत, जे पुर्णतः चुकीचे आहे. जेव्हापासून कोरोना आलेला आहे, तेव्हापासून लोकांची कोरोनाविरुद्धची लढाई कमजोर करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करीत आहेत.

निवडणुकीवेळी राहुल गांधी हे सतत नीरव मोदीची गोष्ट करीत असत. पण तिकडे लंडनमध्ये राहुल यांचे मित्र नीरवला मदत करीत आहेत. भीलवाडा मॉडेलचे श्रेय राहुल गांधी यांना देण्यात आले, पण तेथील सरपंचांनी स्पष्टपणे ही लोकांची मेहनत असल्याचे सांगितले आहे, असेही प्रसाद यांनी नमूद केले. वायनाड मॉडेलचे आरोग्य मंत्रालयाने कौतुक केले असल्याचा दावा करतात. तथापी वायनाड हा कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले असल्याची माहिती प्रसाद यांनी दिली.

स्थलांतरित मजुराबाबत प्रसाद म्हणाले की, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये इतर राज्यातून शेकडो गाड्या जात आहेत, पण महाराष्ट्रातून खूप कमी गाड्या जात आहेत. तेथे काँग्रेसचे सरकार आहे. राहुल गांधी सतत न्याय योजनेबद्दल बोलत आहेत पण त्यांनी सर्वप्रथम ही योजना काँग्रेसशासित राज्यांत राबविली पाहिजे. 

 "