Thu, Nov 26, 2020 20:41होमपेज › National › एवढच बाकी होतं! चिराग पासवानांची लाईट, कॅमेरा, ॲक्शनमध्ये वडिलांना श्रद्धांजली (video)

एवढच बाकी होतं! चिराग पासवानांची लाईट, कॅमेरा, ॲक्शनमध्ये वडिलांना श्रद्धांजली (video)

Last Updated: Oct 28 2020 10:01AM
पाटना : पुढारी ऑनलाईन 

बिहार निवडणुकीच्या दरम्‍यान लोकजन शक्‍ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्‍या व्हिडिओवरून स्‍वत:  चिराग पासवान यांनी वडिलांच्या निधनानंतर मला ६ तासात पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी द्यायची होती. मला पक्षाच्या सर्व कामांनाही पूर्ण करायचे आहे. १० दिवसांपर्यंत मला घरातून बाहेर पडायचे नव्हते. त्‍यामुळे डिजिटल व्हिडिओ शूट करायचा होता. असे चिराग पासवान यांनी म्‍हटले आहे. 

 

अधिक वाचा : कच्चे तेल सहा वर्षात ६१ टक्के स्वस्त, तरी पेट्रोल १० रुपये महाग; आता पुन्हा टॅक्स लावण्याच्या तयारीत!

बिहार नुवडणुकीच्या लोकजन शक्‍ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे चिराग पासवान चर्चेत आले आहेत. चिराग पासवान हे त्‍यांचे वडिल रामविलास पासवान यांच्या निधनानंतर काही दिवसातचं पटनातील त्‍यांच्या निवासस्‍थानी एक व्हिडिओ चित्रित करत असल्‍याचे बोलले जात आहे. 

अधिक वाचा : शरद पवार साहेब, hats off! भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून जाहीर कौतुक

या व्हायरल व्हिडिओ वरून जनता दल यूनायटेट (JDU) ने चिराग पासवान यांच्यावर टीका केली आहे. या व्हिडिओमुळे त्‍यांचे चरीत्र समजून येते. यामुळे त्‍यांचा खरा चेहरा समाजासमोर आल्‍याचे म्‍हटले आहे. जेडीयू प्रवक्‍ता राजीव रंजन यांनी म्‍हटले आहे की, चिराग पासवान हे वडिलांच्या अंतिम संस्‍कारानंतर बेशुध्द पडल्‍याचा व्हिडिओ शूट करत होते. त्‍यांनी दावा केला आहे की, चिराग पासवान यांनी हा व्हिडिओ वडिलांच्या मृत्‍यूनंतर दुसऱ्याच दिवशी चित्रित केला आहे. चिराग यांनी वडिलांच्या मृत्‍यूचे भांडवल करण्याचा आरोपही त्‍यांच्यावर लावण्यात आला आहे. 

अधिक वाचा : मुंबईवर ड्रोन हल्‍ला होण्याची शक्यता

यावर प्रतिक्रिया देताना चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया देताना, मला माहित नाही की, ही व्हिडिओ क्‍लिप का पसरवली जात आहे. मी माझ्या वडिलांच्या निधनामुळे दु:खी आहे. आता मला हे हे सिद्ध करावे लागेल का? असा प्रश्न त्‍यांनी विचारला आहे. मला मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. ते इतक्‍या खालच्या पातळीवरचे राजकारण करतील असे मला वाटले नव्हते. माझे सरकार आल्‍यावर त्‍यांना जेलमध्ये जावे लागेल याची त्‍यांना भिती वाटत असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.