Sat, Aug 08, 2020 12:40होमपेज › National › नवऱ्याने स्मार्टफोन घेऊन दिला नाही म्हणून पत्नीने...

नवऱ्याने स्मार्टफोन घेऊन दिला नाही म्हणून पत्नीने...

Last Updated: May 29 2020 11:14AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

दिल्लीतील मैदान घारी परिसरातील एका 29 वर्षीय महिलेने स्वतःला जाळून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. तिने आपल्या पतीकडे मुलांचे शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरु झाले आहेत ते पाहण्यासाठी तिला स्मार्ट फोन घेऊन देण्याची मागणी केली होती. पण, पतीने ही मागणी पूर्ण न केल्याने त्या महिलेने स्वतःला जाळून घेतले. 

वाचा : पीएम मोदींच्या 'मुड'वरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा 'हवेत' गोळीबार?

संबंधित महिलेले 27 मे रोजी सकाळी 8 च्या सुमारास स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी त्या महिलेला सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ती 90 टक्के भाजली आहे आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.   

वाचा : देशात बाधितांचा आजपर्यंतचा सर्वांत मोठा उद्रेक!

त्या महिलेच्या पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचा विवाह 7 वर्षापूर्वी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. पतीने त्याची पत्नी त्याच्याकडे स्मार्ट फोन घेऊन देण्याची मागणी करत होती. त्यावेळी त्याने तिला लॉकडाऊननंतर फोन घेऊन देण्याचे आश्वासन दिले होते असे सांगितले.