Tue, Sep 29, 2020 10:26होमपेज › National › उपराष्ट्रपतींच्या कुटुंबियांची कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी ५ लाखाची मदत

उपराष्ट्रपतींच्या कुटुंबियांची कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी ५ लाखाची मदत

Last Updated: Aug 05 2020 7:18PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या कुटुंबीयांनी आज कोविड-१९ विरोधातील लढाई आणि अयोध्येतील राम मंदिरासाठी १० लाख रुपयांची देणगी दिली. उपराष्ट्रपतींच्या पत्नी मुप्पावर्पू उषाम्मा नायडू यांनी पुढाकार घेऊन पुत्र हर्ष, स्नूषा श्रीमती राधा मुप्पावर्पू, कन्या दीपा व्यंकट, जावई व्यंकट इम्मानी आणि त्यांचे चार नातू यांच्याकडून वर्गणी जमा केली.

श्रीमती नायडू यांनी ५ लाख रुपयांचा धनादेश पीएम केअर्स निधीकडे पाठवला आणि दुसरा ५ लाख रुपयांचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे अयोध्येत आज झालेल्या भूमीपूजनानंतर राममंदिर उभारणीसाठी पाठवला.

मार्च महिन्यात, उपराष्ट्रपती नायडू यांनी आपले महिन्याचे संपूर्ण वेतन पीएम केअर्स निधीसाठी दिले होते आणि कोविड संक्रमणाविरोधातील लढाईत दर महिन्याला ३० टक्के वेतन देण्याचे जाहीर केले होते.  

 "