Sat, Aug 15, 2020 12:49होमपेज › National › पुलवामात आयईडी स्फोट; दोन जवान शहीद, सात जखमी

पुलवामात आयईडी स्फोट; दोन जवान शहीद, सात जखमी

Published On: Jun 18 2019 11:36AM | Last Updated: Jun 18 2019 11:36AM
श्रीनगर : पुढारी ऑनलाईन

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आयईडी स्फोटात जखमी झालेल्या ९ जवानांपैकी दोन जवान शहीद झाले आहेत. सोमवारी झालेल्या या हल्ल्यात ९ जवान जखमी झाले होते. यातील दोघांची प्रकृती गंभीर होती. ते आज, मंगळवारी शहीद झाले. तर अनंतनाग येथे सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यावेळी एक जवान शहीद झाले तर एक जखमी झाला.

काल, सोमवारी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता. यावेळी ४४ राष्ट्रीय रायफल्सच्या गाडीला आयईडी स्फोटाने उडवून दिले होते. ही गाडी बुलेटप्रुफ होती. तरीही ९ जवान जखमी झाले. यातील दोन जवान आज शहीद झाले. 

गेल्या काही दिवसांपासून पुलवामात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. याआधी पुलवामात १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या ठिकाणापासून २७ किलोमीटर अंतरावर पुन्हा एकदा आयईडी स्फोट घडवून दहशतवाद्यांनी हल्ला केला.