Fri, Sep 25, 2020 18:46होमपेज › National › श्रीनगर जवळ दहशतवादी हल्ला; २ पोलिस शहीद, एक जखमी

श्रीनगर जवळ दहशतवादी हल्ला; २ पोलिस शहीद

Last Updated: Aug 14 2020 11:09AM

file photoश्रीनगर : पुढारी ऑनलाईन

जम्मू काश्मीरमधील श्रीनगर जवळील नौगाम येथे पोलिस पथकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात दोन पोलिस शहीद झाले आहेत. तर एक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराची घेराबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे.

वाचा : ७ महिन्यांत १५४ दहशतवाद्यांचा खात्मा 

दहशतवाद्यांनी नौगाम येथे १५ ऑगस्टच्या निमित्ताने सुरक्षेसाठी तैनात पोलिस पथकावर हल्ला केला. श्रीनगर जवळील नौगाम येथे आज शुक्रवारी सकाळी हा हल्ला घडवून आणण्यात आला. जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान दोन पोलिस शहीद झाले. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी दहशतवादी हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. ज्या भागात हल्ला झाले आहे तेथे सर्च ऑपरेशन सुरु आहे.

वाचा : लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करुन घेत नाही ना?; शिवसेनेचा सवाल 

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी ७ महिन्यांत आतापर्यंत १५४ दहशतवाद्यांचा सुरक्षायंत्रणेने खात्मा केला आहे. शिवाय या वर्षीच्या ७ महिन्यांत शहीद होणार्‍या सैनिकांचा आकडा गतवर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. २०१९ च्या पहिल्या सात महिन्यांत ७४ जवान शहीद झाले होते. तर, या वर्षी आतापर्यंत ३४ जवान शहीद झाले आहेत. 

 "