Wed, Jun 23, 2021 01:07
धक्कादायक: बहिणीचा मृतदेह आणायला गेलेल्या भावाला बसला धक्का; मृतदेहच सापडेना

Last Updated: May 18 2021 4:13PM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

दिल्लीत कोरोनामुळे हाहाकार उडाला असताना अनेक ह्रदयद्रावक घटना समोर येत आहेत. कुटुंब कोरोनाबाधित झाल्याने प्रत्येकाला आयसोलेट राहावे लागले. दरम्यानच्या काळात तरुणीचा मृत्यू झाला मात्र, कोरोनामुळे मृतदेह ताब्यात घेता आला नाही. अखेर एक महिन्यांने तरुणीचा भाऊ रुग्णालयात गेला असता मृतदेहच सापडला नाही. त्यामुळे कुटुंबाला धक्का बसला असून रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

वाचा : भारतीय नौदलाच्या बचाव मोहिमेचा थरारक व्हिडिओ 

कोरोनाची लागण झालेल्या बहिणाला संबधित तरुणाने  एक महिन्यापूर्वी दिल्लीमधील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात मृत्यू झाला होता.. दीपिका असे तरुणीचे नाव असून तिच्या यांच्या मृतदेहाचा शोध न लागल्याने कुटुंबाने अखेर रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

वाचा : "ताउक्ते" चक्रीवादळाने ठाण्यात तीघांचा मृत्यू

एप्रिल महिन्यात तिचा मृत्यू झाला होता, तत्पुर्वी दीपिकाची प्रकृती बिघडल्यानंतर नोएडामधील राम सिंग हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केले होते. १५ एप्रिल रोजी तिला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर कित्येक तास प्रयत्न केल्यानंतर अखेर सिद्धार्थ या तिच्या भावाने लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात यश मिळविले. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने दोन ते दिवसांनी मृतदेह नेण्यासाठी सिद्धार्थला बोलावलं होतं. मात्र, सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ते विलगीकरणात होते.

वाचा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांचा बळी!

कोरोनामुक्त झाल्यानंतर मृतदेह नेण्यासाठी सिद्धार्थ रुग्णालयात पोहोचला तेव्हा शवगृहात मृतदेहाचा शोध सुरू झाला. पण सापडला नाही. मृतदेह सापडल्यानंतर कळवू असं सांगून सिद्धार्थला घरी पाठवण्यात आले. यानंतर अखेर सिद्धार्थने पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. महिनाभरातनंतरही दीपिकाचा मृतदेह सापडलेला नाही.

वाचा : रजनीकांतची सीएम फंडला भरघोस मदत