Wed, Oct 28, 2020 11:16होमपेज › National › पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे शनिवारी उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे शनिवारी उद्घाटन

Last Updated: Oct 01 2020 5:55PM

पंतप्रधान नरेंद्र मोदीनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अटल बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि.३) रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वतः नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशचा दौरा करणार आहेत. 

मनाली ते लाहौल - स्फिती यांना जोडणाऱ्या या बोगद्याची लांबी ९.०२ किलोमीटर इतकी आहे. बाराही महिने लाहौल - स्फितीपर्यंत पोहोचण्याची सोय बोगद्यामुळे होणार आहे. हिवाळ्यातील बर्फवृष्टीमुळे सध्या मनाली ते लाहौल - स्फिती हा मार्ग सहा महिने बंद ठेवावा लागतो. तथापि अटल बोगद्यामुळे केव्हाही लाहौल - स्फितीला पोहोचणे शक्य होणार आहे. अटल बोगद्यामुळे दुर्गम असलेल्या या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. 

बोगद्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त लाहौल - स्फितीमधील शिसू व सोलंग व्हॅली येथे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिमालय पर्वतरांगामधील पीर पांजाल शृंखलेत ३ हजार मीटर अर्थात १० हजार फूट उंचीवर अटल बोगदा बनविण्यात आला आहे. मनाली ते लेह दरम्यानचे अंतर अटल बोगद्यामुळे ४६ किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाचा वेळदेखील ४ ते ५ तासांनी कमी होणार आहे. 

अधिक वाचा 

डिझेल दरात १० पैशांची कपात

कोरोनाचा कहर! महाराष्ट्रात ४०% मृत्यूंची नोंद
 

 "