Tue, Sep 29, 2020 09:37होमपेज › National › केरळ विमान दुर्घटनेला 'टेबलटॉप रनवे' कारणीभूत; यावर विमानाचे लँडिंग का असते धोकादायक?

केरळ विमान दुर्घटनेला 'टेबलटॉप रनवे' कारणीभूत; यावर विमानाचे लँडिंग का असते धोकादायक?

Last Updated: Aug 08 2020 9:48AM

दुर्घटनाग्रस्त झालेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान.कोझिकोड (केरळ) : पुढारी ऑनलाईन

दुबई येथून केरळकडे येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान कोझिकोड विमानतळावर लँडिंग दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. हे विमान धावपट्टीवर उतरताना घसरले आणि ३५ फूट खोल दरीत कोसळले. या विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. या दुर्घटनेत दोन वैमानिकांसह १८ जणांचा करुण अंत झाला आहे. तर १२७ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेला विमानतळावरील टेबलटॉप रनवे कारणीभूत ठरल्याची माहिती पुढे आली आहे. अशा रनवेवर विमानाचे लँडिंग करणे खूप धोकादायक असते. तर या विमानतळावर विमानाचे लँडिंगही व्यवस्थित झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

वाचा : मुंबईत येणार्‍यांनाही 14 दिवस क्वारंटाईन

केरळमधील कोझिकोड विमानतळ भौगोलिकदृष्ट्या टेबलटॉप स्वरुपाचा आहे. या विमानतळाच्या आजूबाजूला खोल दऱ्या आहेत. टेबलटॉप रनवे हे उचं डोंगरावरील सपाट जागेवर उभारले जातात. टेबलटॉप रनवे संपल्यानंतर पुढे ज्यादा जागा शिल्लक नसते. यामुळेच कोझिकोड रनवेवर विमान घसरल्यानंतर ते ३५ फूट खोल दरीत जाऊन कोसळले. यामुळे विमानाचे दोन तुकडे झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टेबलटॉप रनवे म्हणजे काय?

धावपट्टीच्या दोन्ही बाजूला खोल दरी असल्याने टेबलटॉप रनवेवर अधिक जोखीम असते. या ठिकाणी विमान लँडिंग आणि उड्डाण करताना वैमानिकांना खूप सतर्क रहावे लागते. यामुळे या विमानतळावरील वैमानिक खूप कूशल असतात. टेबलटॉप रनवे हे पठार आणि उंच डोंगरावर उभारले जातात. कर्नाटकातील मंगळूर, केरळमधील कोझिकोड आणि मिझोराममध्ये टेबलटॉप रनवे उभारण्यात आले आहेत.

वाचा : लॉकडऊनमध्ये मुलांमध्ये वाढतोय अम्ब्लोपिया

दुर्घटनाग्रस्त झालेले एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात १९१ प्रवासी होते. यात १२८ पुरुष, ४६ महिला, ११ बालके तसेच ७ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. प्रवाशांपैकी १२७ जण जखमी तर १५ जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले. विमानातील कॉकपिटचा भाग (समोरील भाग) पूर्णत: उद्धवस्त झाला आहे. विमानाचे २ तुकडे झाल्याचे अपघाताच्या फुटेजवरून दिसते आहे. दुर्घटनेनंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले. काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले.

पावसामुळे विमान घसरल्याचे सांगण्यात येते. काल सायंकाळी ७.३८ वाजता विमान धावपट्टीवर उतरत असताना मुसळधार पाऊस सुरू होता. धावपट्टीला विमानाची चाके भिडली तसे विमान घसरले आणि ३० फूट खोल दरीत जाऊन पडले.

ही एक दुर्दैवी घटना... 

या दुर्घटनेत २ वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही एक दुर्दैवी घटना आहे. १२७ लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. 

वाचा :गणपती विशेष ट्रेन सोडण्यास हिरवा कंदील

 

 "