Fri, Sep 25, 2020 18:36होमपेज › National › अवमान प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण दोषी

अवमान प्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण दोषी

Last Updated: Aug 14 2020 12:17PM

वरिष्ठ वकिल प्रशांत भूषणनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने दोषी ठरविले आहे. सरन्यायाधीश आणि अन्य चार माजी सरन्यायाधीश यांच्याबाबत अपमानजनक ट्विट केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याबद्दल त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांच्या शिक्षेबाबत २० ऑगस्ट रोजी युक्तिवाद होणार आहे.

वाचा : लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करुन घेत नाही ना?; शिवसेनेचा सवाल 

अवमान प्रकरणी कोर्टाने ५ ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण निकाल राखून ठेवला होता. प्रशांत भूषण यांनी दोन ट्विट केले होते. त्यातून कथितरित्या कोर्टाचा अवमान केला होता. या प्रकरणी कोर्टाने प्रशांत भूषण यांना २२ जुलै रोजी नोटीस बजावली होती. या प्रकरणी न्यायमूर्ती अरुण मिश्रा, बी आर गवई आणि कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने भूषण यांना दोषी ठरविले आहे. 

वाचा : मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात, वादळी‌ वाऱ्यासह मुसळधारेचा इशारा

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या या निकालात तीन सदस्यीय खंडपीठाने अवमान प्रकरण गंभीर असून प्रशांत भूषण यांनी केलेल्या ट्विटमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला असल्याचे म्हटले आहे. कंटेम्ट ऑफ कोर्ट्स ॲक्ट, १९७१ नुसार प्रशांत भूषण यांना सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, जर त्यांनी माफी मागितली तर कोर्ट त्यांना माफ देखील करु शकते, अशी तरतूद देखील या कायद्यात आहे. 
 

 "