Sat, Feb 27, 2021 06:40
दुधात नशिले पदार्थ मिसळून सात जणांची कत्तल करणाऱ्या शबनमची फाशी लांबली

Last Updated: Feb 23 2021 5:43PM

मथुरा पुढारी ऑनलाईन

प्रेमसंबंधांत अडथळा ठरत असल्याच्या रागातून पोटच्या आईबापासह, भाऊ, बहीण, वहिणी आणि भाच्यांची निर्दयी कत्तल करणाऱ्या उत्तरप्रदेशातील शबनमची फाशी लांबली आहे. तिची दया याचिका प्रलंबित असल्याने मथुरा कोर्टाच्या न्यायाधिशांनी तिचा डेथ वॉरंट काढला नाही. परिणामी तिची फाशी लांबली आहे. 

वाचा : सांगली महापालिका: जयंत पाटलांनी केला चंद्रकांत पाटलांचा दुसऱ्यांदा ‘कार्यक्रम’

रामपूर जेलमध्ये असलेल्या शबनमला फाशी देण्याची सर्व तयारी झाली असताना तिचा डेथ वॉरंट निघाला नाही. परिणामी तिला कधी फाशी देणार याबाबत संधिग्धता निर्माण झाली आहे. सरकारी वकिलांनी मथुरा कोर्टातील न्यायाधिशांकडे डेथ वॉरंट मागितला असता अजून तिची दया याचिका प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. 
जेलमध्ये असलेल्या शबनमला फाशी कधी होणार हे अजून स्पष्ट नाही. मात्र, या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. शबनमने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्याची माहिती तिचा मुलगा ताज याने केली आहे. 

वाचा : विधानसभा अध्यक्षपद : शिवसेनेला हवेत मुरब्बी पृथ्वीराज चव्हाण 

जेलमध्ये शबनम आणि तिचा मुलगा ताज याची दोन तास भेट झाली.  यावेळी तिच्या मुलाचा केअर टेकर उस्मान सोबत होता. आपल्या मुलाला पाहून ती खूप भावूक झाली. तिने मुलाला खूप शिकण्यास सांगितले. त्यावेळी तिच्या मुलाने तिचा गुन्हा काय असे विचारले. यावर तिने आपल्याला गुंतवले असल्याचे सांगितले. तिने याआधीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु ती फेटाळण्यात आली होती. 

वाचा : कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तिघांवर गुन्हा 

काय आहे प्रकरण 
१४ एप्रिल, २००८ रोजी प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या रागातून उत्तरप्रदेशातील हसनपूर तालुक्यातील बावनखेडी गावाता एका रात्रीत सात जणांचा खून केल्याचा आरोप शबनमवर आहे. यामध्ये तिचे आई, वडील, दोन भाऊ, वहिणी, दोन भाचे आणि अन्य एका नातेवाईक तरुणीला दुधातून गुंगीचे औषध घातले. त्यानंतर तिने कुऱ्हाडीने एकेकाला मारले होते. शबनमच्या घरात आजही सात थडगी आणि भिंतींवर रक्ताचे डाग त्या भयंकर हत्याकांडाची आठवण करून देतात. 

वाचा : साक्षात मृत्‍यू समोर होता, रक्ताच्या थारोळ्यात असताना त्यांनी लिहिले...!