Fri, Sep 25, 2020 17:50होमपेज › National › सचिन पायलटांची नवीन आसन व्यवस्था विरोधी बाकांजवळ, पायलट म्हणाले....

सचिन पायलटांची नवीन आसन व्यवस्था विरोधी बाकांजवळ, पायलट म्हणाले....

Last Updated: Aug 14 2020 4:25PM
जयपूर : पुढारी ऑनलाईन 

राजस्थानातील गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली राजकीय अस्थिरता संपवत माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची गळाभेट झाली. त्यामुळे बंडखोरीच्या विस्तवावर पाणी पडले असा विचार सर्वजण करत असतानाच अजून त्या विस्तवातून धूर निघत आहे असे आज (दि.14) विधानसभा सत्राच्या पहिल्याच दिवशी दिसून आले. 

गेहलोत सरकारने राजस्थानमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला!

राजस्थान विधानसभेच्या गेल्या सत्रात तत्कालीन उपमख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आजूबाजूला बसत होते. पण, आजपूसन सुरु झालेल्या विधानसभा सत्रात सचिन पायलट यांची जागा बदलण्यात आली आहे. त्यांची जागा विरोध पक्षांच्या आसन व्यवस्थेच्या अगदी जवळ ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ सचिन पायलट यांची आसनव्यवस्था ही सत्ताधारी पक्षाच्या अत्यंत काठावर करण्यात आली आहे. 

श्रीनगर जवळ दहशतवादी हल्ला; २ पोलिस शहीद

याबाबत सचिन पायलट यांनी 'मी जेव्हा सभागृहात आलो त्यावेळी माझी आसनव्यवस्था बदलण्यात आल्याचे माझ्या निदर्शनास आले. मला याचे आश्चर्य वाटले. ज्यावेळी मी ( सत्ताधारी बाकांकडे बोट करुन ) त्या ठिकाणी बसत होतो त्यावेळी मला सुरक्षित वाटत होते. पण त्यानंतर मला समजले की मला सीमेवर पाठवण्यात आले आहे. कारण फक्त शक्तीशाली आणि धाडसी योद्धेच सीमेवर पाठवले जातात.' असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य ज्याप्रमाणे विरोधकांना इशारा देणारे मानले जात आहे. त्याच प्रमाणे ते पायलट स्वतःच्या पक्षालाही एक वेगळा संदेश देणारे मानले जात आहे. 

गेल्या महिन्याभराची कोंडी फोडत नाराज पायलट गट आणि गेहलोत गटात मनोमिलन झाले. त्यामुळे तुर्तास जरी या सत्तासंघर्षावर पडदा पडला असला तरी. दोन्ही गटाच्या नेत्यांची मनोमिलनाची वक्तव्ये पाहिली तर 'पिक्चर अभी बाकी है!' असे दिसते.

मनोमिलनानंतर काल काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सचिन पायलट आणि गेहलोत पहिल्यांदा एकत्र आले होते. त्यावेळी कॅमेऱ्यासमोर गेहलोतांनी 'नाराज आमदारांना माहित असावे की त्यांच्या पाठिंब्याशिवायही मी विश्वास मत सिद्ध केले असते.' असे वक्तव्य केले होते. यावरुन गेहलोतांनी अजून आपली तलवार म्यान न केल्याचे संकेत मिळत आहेत. 

अवमान प्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण दोषी

त्यानंतर आज सभागृहात 'आसनव्यवस्थेचे राजकारण' रंगले. पायलटांना सत्ताधारी बाकाच्या अत्यंत काठावर आणि दुसऱ्या रांगेत स्थान मिळाले. त्यानंतर विश्वास मताच्या चर्चेदरम्यान भाजपने केलेल्या टीकेला उत्तर दिले त्यावेळी ते भाजपचे नेते राजेंद्र रोठोड बोलत असताना मधेच म्हणाले की 'या चर्चेदरम्यान अनेक गोष्टी बोलल्या जातील अनेक गोष्टींचा उलगडा होईल. पण आपण काही बोलण्यापूर्वी सांगू इच्छितो की आम्ही आमचा इलाज शोधला आहे. आम्ही दिल्लीच्या डॉक्टरकडून सल्ला घेतला आहे. आता आम्ही परत आलो आहोत. आम्ही एकसंध आहोत.' त्यांचा रोख दिल्लीत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वधेरा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील तोडग्याकडे होता. दिल्लीत पायलट यांना दिल्लीच्या नेतृत्वाने त्यांचे आणि गेहलोतांबरोबरचे मतभेद मिटवण्याबाबत आश्वस्त करण्यात आले आहे.  

तसेच पायलटांनी 'आम्ही आमच्या शस्त्रांसह फ्रंटलाईनवर लढण्यासाठी सज्ज आहोत.' असे सुचक वक्तव्यही केले, या वक्तव्यावर सर्वांनी बाके वाजवून त्यांना प्रतिक्रिया दिली. 

 "