Fri, Oct 02, 2020 01:54होमपेज › National › पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव 

पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव 

Last Updated: Sep 17 2020 9:10AM

पंतप्रधान नरेंद्र मोदीनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी ७० वा वाढदिवस साजरा करीत आहेत. मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत देशभरात दिल्ली ते गल्लीपर्यंत भाजप कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 'सेवा सप्ताह'च्या स्वरूपात साजरा केला जात आहे.

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राजकारण बाजूला सारत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गजांनी मोदींना वाढविदसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
भारताचे जीवन मूल्य तसेच लोकशाही परंपरेत तुम्ही निष्ठेचा एक आदर्श प्रस्तुत केला आहे. देव सदैव तुम्हाला निरोगी तसेच आनंदी ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. राष्ट्राला आपल्या अमूल्य सेवा मिळत राहो, अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही पंतप्रधानांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. “मोदींच्या रुपात देशाला एक असे नेतृत्त्व मिळाले ज्यांनी लोक-कल्याणासाठी वंचित वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले आणि एका मजबूत भारताचा पाया रचला”, असे ट्वीट शहा यांनी केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. “पंतप्रधान मोदी सतत गरीब आणि उपेक्षितांना सशक्त बनवण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहेत”, असे ट्वीट त्यांनी केले.

यशस्वी पंतप्रधानांचे कार्य तसेच नेतृत्वावर सर्वांना अभिमान आहे. अश्याच प्रकारे देशाचे नाव उंचावत भारताला विश्वगुरु बनवण्याचे स्वप्न तुम्हच्या हस्ते पूर्ण होवो हीच कामना, अशी भावना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त करीत पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

पंतप्रधानाचे सेवा संकल्पाच्या सिद्धी करीता समर्पित जीवन सर्वांना मानवतेच्या कल्याण तसेच राष्ट्र सेवेकरीता प्रेरणा देणारे आहे, अशी भावना लोकसभा अध्यक्ष ओम बिडला यांनी व्यक्त करीत पंतप्रधानांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
 
देशाला प्रगतीपथावर अग्रसर करीत जागतिक व्यासपीठावर भारतवर्षच्या मान सन्मान वाढवणारे जननायक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. व्यक्ती निर्माण सह राष्ट्रनिर्माणाकरीत समर्पित आपले जीवन आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे, अशी भावना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केली.
 
नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला. यंदा ते वयाच्या ७१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत, मोदींबाबत विशेष म्हणजे स्वतंत्र भारतात जन्मलेले ते पहिले वहिले पंतप्रधान आहेत. २०१४ पुर्वी केवळ गुजरात पुरते मर्यादित असलेले नरेंद्र मोदी आज भारताची ओळख म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. २०१४ पासून देशाची धुरा पंतप्रधान म्हणून ते सांभाळत आहेत.
 

 "