Tue, Aug 11, 2020 23:49होमपेज › National › चिनी ॲप्सवरील बंदीचा निर्णय योग्यच; उच्चस्तरीय समितीचा निष्कर्ष 

चिनी ॲप्सवरील बंदीचा निर्णय योग्यच; उच्चस्तरीय समितीचा निष्कर्ष 

Last Updated: Jul 02 2020 1:48PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

चिनी ॲप्सवरील बंदीचा निर्णय योग्यच असल्याचा निष्कर्ष केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीने काढला आहे. भारत आणि चीन यांच्यादरम्यानचा तणाव शिगेला पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच 59 चिनी ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती. 

बंदीच्या निर्णयावर विचारविमर्श करण्यासाठी केंद्र सरकारने गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय, इलेक्ट्रानिक आणि आयटी मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमच्या प्रतिनिधीची एक समिती नेमली होती. या ॲप्सची डेटा शेअरिंग करण्याची कार्यप्रणाली लक्षात घेऊन आयटी तसेच इलेक्ट्रॉनिक सचिवांनी आपल्याकडील आपत्कालीन अधिकारांचा वापर करीत 59 ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. ॲप्सवर बंदी घालण्याचा हा निर्णय योग्य असल्याचे उच्चस्तरीय समितीने स्पष्ट केले आहे. 

चिनी ॲप्सवर घालण्यात आलेली बंदी ही अंतरिम स्वरूपाची आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी चिनी ॲप्स चालविणाऱ्या कंपन्याच्या प्रतिनिधींना आपली बाजू मांडण्याची एक संधी मिळेल. चालू आठवड्यात कंपन्याचे प्रतिनिधी आपली बाजू मांडू शकतात. देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगत सरकारने गेल्या सोमवारी 59 ॲप्सवर बंदी घातली होती. त्यात टिकटॉक या प्रसिद्ध ॲपचा समावेश होता.