Sat, Aug 08, 2020 11:00होमपेज › National › रशियाकडून २१ 'मिग-२९' विमान खरेदीला मंजुरी

रशियाकडून २१ 'मिग-२९' विमान खरेदीला मंजुरी

Last Updated: Jul 02 2020 6:59PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पूर्व लडाखमधील गलवान खोर्यात भारत चीनदरम्यान उफाळलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून २१ नवीन 'मिग-२९' विमानांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने यासंबंधीची मंजूरी दिली आहे. 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताकडून१२ सुखोई युद्ध विमानांचीही खरेदी करण्यात येणार आहे. बैठकीतून ३८ हजार ९०० कोटींच्या विमान खरेदीच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिक वाचा : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा लेह दौरा पुढे ढकलला

संरक्षण मंत्रालयाने सद्यस्थितीत देशात असलेल्या ५९​ मिग-२९ विमान अद्ययावत करण्यासह १२ एसयू-३० एमकेआय तसेच २१ मिगसह रशियातून २२ नवीन विमान खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यासाठी जवळपास १८ हजार १४८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

अधिक वाचा : 'भारत डिजिटल स्ट्राईक करणे जाणतो'

या सोबतच हवाई दल तसेच नौसेनेसाठी २४८ अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअरटू एअर मिसाईल खरेदीलाही मंजूरी देण्यात आली आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) हजार किलोमीटरपर्यंतच्या स्ट्राईक रेंज लॅन्ड अटॅक क्रुज मिसाईलचे डिझाईन क्लीयर करीत ते विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. डिफेन्स ॲक्विजिशन काउंसिलने (डीएसी) ३८ हजार ९०० रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहेत. यातील ३१ हजार १३० कोटी रुपयांची खरेदी भारतीय उद्योगांकडून करण्यात येईल. पिनाका रॉकेट लॉन्चर, बीएमपी, कॉम्बॅकव्हीकल अपग्रेड तसेच लष्करासाठी सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडियो खरेदीला मंजूरी देण्यात आली आहे. 

अधिक वाचा : प्राप्तीकर वाचविण्यासाठी 'या' तारखेपर्यंत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी!