Wed, May 19, 2021 04:31होमपेज › National › दिराकडून वहिणीच्या बहिणीची हत्या

दिराकडून वहिणीच्या बहिणीची हत्या, बलात्काराचा संशय

Last Updated: Nov 22 2020 8:59PM
उत्तर प्रदेश : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील अतर्रा कस्बे गावात एका लहान मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस  आली आहे. मुलीच्या मोठ्या बहीणीच्या दिराने कुऱ्हाडीने हत्या केल्याचम समोर आलं आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार मध्यप्रदेशात राहणाऱ्या त्या मुलीचा बलात्कार करून हत्या केल्याची संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. अतर्रा परिसरातील पोलिस उपाधीक्षक सत्यप्रकाश शर्मा म्हणाले, की मध्यप्रदेश जिल्ह्यात राहणारी मुलगी तिच्या मोठ्या बहिणीकडे आली होती. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बहिणीच्या घरात तिच्या दिराने त्या मुलीला कुऱ्हाडीने ठार मारले व नंतर तेथून पळून गेला. ही घटना घडली त्या वेळी मुलगी व आरोपीशिवाय घरात कोणीच नव्हते.

पोलिसांनी सांगितले की, या घटनेनंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिस पथक त्याच्यामागावर आहेत. पोलिस उपाधीक्षकांनी सांगितले की, प्रथम दर्शनी असे वाटते की बलात्कारानंतर त्या मुलीची हत्या केली आहे. परंतु, पोस्टमॉर्टम अहवाल येण्यापूर्वी अधिकृतपणे काहीही सांगता येत नाही.