Mon, Aug 10, 2020 21:45होमपेज › National › 'पीएम श्रमयोगी मानधन' योजनेचे अल्पावधीत लाखो लाभार्थी; जाणून घ्या कसा लाभ घेता येईल

'पीएम श्रमयोगी मानधन' योजनेचे अल्पावधीत लाखो लाभार्थी; जाणून घ्या कसा लाभ घेता येईल

Last Updated: Jul 09 2020 5:55PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशातील गरीब, गरजू, कमी उत्पन्न असलेल्या वर्गासाठी केंद्र सरकारकडून 'पंतप्रधान श्रमयोगी मानधन' योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेंतर्गत लाभार्थ्यांना  पेन्शन सुविधा उपलब्ध करवून दिली जाते. ही योजना अल्पावधीतच यशस्वी झाली असून आतापर्यंत लाखो नागरिकांनी योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. 

अधिक वाचा : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

योजनेनुसार ६० वर्षानंतर महिन्याकाठी ३ हजार रूपयांचे पेन्शन उपलब्ध करुन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. १८ ते ४० वयोगटातील कुठलाही नागरिकाला योजनेचा लाभ घेता येईल. पंरतु, संबंधिताचे मासिक उत्पन्न हे महिन्याकाठी १५ हजारांहून जास्त नको, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गत दोन वर्षात ४४ लाखांहून ​अधिक नागरिकयोजने सोबत जुळले आहेत. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे.

अधिक वाचा : 'कोरोना महामारीने भारताची 'फार्मा ॲसेट' जगाला दाखवून दिली'

४४.१७ लाख नागरिकांची नोंदणी

योजनेअंतर्गत ४४ लाख १७ हजार २७५ नागरिकांनी नोंदणी केली आहे. यातील २० लाख ७८ हजार ९१४ नोंदणी महिलांच्या आहेत. तर, १८ लाख ३२ हजार ४४० पुरुषांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे. सर्वाधिक नोंदणी हरियाणा राज्यात करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत ८ लाख १ हजार २३९ नागरिकांनी नोंदणी केली आहे. हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगढ तसेच बिहारचा क्रमांक आहे. योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये २६  ते ३५ वयोगटातील नागरिकांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २० लाख १५ हजार ८७६ आहे. 

अधिक वाचा : सोशल मीडियावर मास्क परोठ्याचा धुमाकूळ

५५  रुपयांपासून अंश दानाला सुरुवात

योजनेअंतर्गत वयोगटानुसार ५५ ते २०० रुपयांची महिन्याकाठी योगदानाची तरतूद करण्यात आली आहे. १८ व्या वर्षीच योजने सोबत जुळलेल्या लाभार्थ्यांकडून ५५  रुपये मासिक अंश दान स्वीकारले जाईल. तर, ३० वयोगटील अर्जदारांकडून १०० तसेच ४० वयोगटातील व्यक्तीला २०० रुपयांचे योगदान द्यावे लागेल. १८ वर्षाच्या युवकाला वर्षाचे ६६० रुपये भरावे लागतील. असे ४२ वर्षांपर्यंत संबंधिताची एकूण गुंतवणूक २७ हजार ७२० होईल. यानंतर लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपयांची पेन्शन आयुष्यभर मिळेल. जेवढे योगदान खातेधारकाचे राहील तेवढेच योगदान केंद्र सरकारकडून देण्यात येईल. 

जवळच्या सुविधा केंद्रात करता येईल नोंदणी

योजनेत नोंदणी करण्यासाठी इछुकांना जवळच्याच सुविधा केंद्रात जावून बॅक खाते अथवा जनधन खात्याची माहिती आधारकार्डसह द्यावी लागेल. संगणकात नावनोंदणी करण्यात आल्या नंतर महिन्याकाठी देण्यात येणाऱ्या अंशदानासंबंधी माहिती मिळेल. योजनेची अधिक माहिती १८००२६७६८८८ या टोल फ्री क्रमांकावरून मिळवता येईल, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. सुरुवातीच्या योगदान नगदी स्वरूपात जमा करावे लागेल. योजनेचे खाते सुरु झाल्या नंतर श्रमयोगी कार्डही लाभार्थ्यांना देण्यात येईल.