Sat, Aug 08, 2020 11:52होमपेज › National › #Chandrayaan2 : चंद्राच्या दिशेने आता खऱ्या अर्थाने प्रवास : इस्रो अध्यक्ष के. सिवान

#Chandrayaan2 : चंद्राच्या दिशेने आता खऱ्या अर्थाने प्रवास : इस्रो अध्यक्ष के. सिवान

Published On: Jul 22 2019 3:57PM | Last Updated: Jul 22 2019 4:11PM
श्रीहरिकोटा : पुढारी ऑनलाईन

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज (ता.२२) ऐतिहासिक कामगिरी करत ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण केले. काही वेळातच इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रेक्षपण झाल्याचे जाहीर केले. ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रेक्षपण झाल्याचे जाहीर करताना खूप अत्यानंद होत असल्याची प्रतिक्रिया सिवन यांनी दिली. या यशस्वी मोहिमेबद्दल सिवन यांनी इस्रोच्या टीमचे अभिनंदन केले.

अधिक वाचा : 'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम 

भारताचा चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवास सुरु झाला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरून वैज्ञानिक प्रयोग करता येणार असल्याचे सिवन यांनी सांगितले. वैज्ञानिक आणि टीम इस्रोच्या मेहनतीला यश मिळाले आहे. इस्रोच्या टीमने घर, कुटुंबाची चिंता सोडून ७ दिवस तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करत आहे, असे सिवन यांनी म्हटले.

अधिक वाचा : 'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)

१६ दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार

चांद्रयान-२ चे भारताचे सर्वांत शक्तिशाली रॉकेट जीएसएलव्ही एमके-३ द्वारे प्रक्षेपण करण्यात आले. प्रेक्षपणानंतर चांद्रयान-२ पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले. हे १६ दिवस पृथ्वीच्या कक्षेत परिक्रमा करत चंद्राच्या दिशेने जाईल.

१५ जुलै रोजी ‘चांद्रयान-२’च्या प्रक्षेपणात तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे याचे प्रक्षेपण पुढे ढकलले होते. तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्यानंतर त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. आता ‘चांद्रयान-२’ हे चंद्रावर अधिक वेगाने जाणार आहे.