Sat, Aug 08, 2020 10:56होमपेज › National › पीएम मोदींच्या लेह रुग्णालयातील ‘त्या’ छायाचित्रांवरून अखेर लष्कराने केला खुलासा!

पीएम मोदींच्या लेह रुग्णालयातील ‘त्या’ छायाचित्रांवरून अखेर लष्कराने केला खुलासा!

Last Updated: Jul 04 2020 5:51PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि चीन दरम्यान सीमेवर तणावस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि. ३) अचानक लेह आणि लडाखचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गलवान खो-यात चीनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली व त्यांचे त्यांचे मनोधैर्य वाढवले. त्यानंतर या भेटीची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र, या छायाचित्रांवरून पीएम मोदी यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. पण, आज (दि. ४) खुद्द लष्करानेच एक पत्रक काढून खुलासा केला आहे. 

लष्कराचा खुलासा काय आहे... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलै २०२० ला लेहमधील रुग्णालयाला दिलेल्या भेटी दरम्यान दिसत असलेल्या सोयी सुविधांबाबत काही ठिकाणी दुर्भाग्यपूर्ण आणि असमर्थनीय शंका घेणारे संदेश पसरताना आढळून आले आहेत.

अधिक वाचा : हिरो सायकल कंपनीकडून चीनसोबतचा तब्बल ९०० कोटींचा करार रद्द!

आपल्या लष्करी दलातील शूर सैनिकांवर सुरू असलेल्या उपचारांबाबत शंका घेणे दुर्दैवी आहे. लष्करी दले आपल्या जवानांना सर्वोत्तम उपचार देतात.

या सोयी सुविधा आपत्कालीन विस्ताराचा भाग आहेत. १०० खाटा असलेला हा विस्तारित भाग या रुग्णालय परिसराचाच आहे.

कोविड १९ दरम्यान पालन कराव्या लागणाऱ्या नियमांनुसार सार्वजनिक रुग्णालयाचे काही वॉर्ड्स विलगीकरण कक्षात रूपांतरित करणे आवश्यक होते. हे रुग्णालय कोविड-१९ विशेष रुग्णालय म्हणून राखल्यामुळे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे आणि दृक्श्राव्य माध्यमाची सोय असलेले सभागृह वॉर्डमध्ये रुपांतरीत करण्यात आले.

अधिक वाचा : 'मेड इन इंडिया अंतर्गत व्हेंटिलेटर्सचा पुरवठा'

जखमी शूर सैनिकांना गलवानमधून इथे आणण्यात आल्यानंतर त्यांना कोविड १९ साठी राखीव भागापासून दूर ठेवणे आवश्यक होते. लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे लष्कराच्या कमांडरांसह जखमी शूर सैनिकांना भेटण्यासाठी याच ठिकाणी आले होते.

दरम्यान, सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लेह-लडाख भेटीवरून त्यांना व भाजपाला ट्रोल केले जात आहे. तसेच #MunnaBhaiMBBS हा ट्रेंडही आला आहे. या टिकेनंतर आता खुद्द लष्कराने पत्रक काढून खुलासा केला आहे.

अधिक वाचा : चिन्यांची ॲप बंद करताच पीएम मोदींनी दिले नवे चॅलेंज!