होमपेज › National › ‘पाकिस्तानच्या कुरापतींना सणसणीत प्रत्युत्तर द्या’

‘पाकिस्तानच्या कुरापतींना सणसणीत प्रत्युत्तर द्या’

Last Updated: Jul 13 2020 10:25PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कुरापतींना सणसणीत प्रत्युत्तर द्या, अशा सूचना लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी सोमवारी लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांना  केल्या. केंद्र सरकार आणि लष्कराच्या सर्व यंत्रणा मिळून काम करीत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आणखी वाचा : नवरा गर्लफ्रेंडसह 'रेंज रोव्हर'मधून जात असताना बायकोने ओव्हरटेक करुन भर रस्त्यातच...! (video)

गेले काही दिवस सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि दहशतवाद्यांकडून होणार्‍या घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख नरवणे यांनी सोमवारी जम्मू-पठाणकोट भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी आघाडीवर तैनात रायझिंग स्टार कॉर्प्सच्या जवानांची कारवाई, सुरक्षा व्यवस्था आदींची माहिती जाणून घेतली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करताना त्यांनी पाकिस्तानच्या बाबतीत झीरो टॉलरन्स या भूमिकेचा पुनरुच्चार केला. पाकिस्तानच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर देण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.

आणखी वाचा : कोरोना विषाणूची परीक्षा पडली महागात, गेला हकनाक बळी 

दरम्यान, लष्करप्रमुखांनी पश्चिम कमांडच्या सर्व रँकच्या अधिकार्‍यांशी व्हीसीद्वारे संवाद साधत त्यांचे मनोबल वाढविले. शत्रूचा कोणताही हल्ला परतवून लावण्यासाठी आपले लष्कर सक्षम असल्याचे नमूद करतानाच त्यांनी पश्चिम कमांडने कोरोनाविरोधी लढाईत केलेल्या प्रयत्नांचे तसेच ऑपरेशन नमस्तेचे कौतुक केले. 

आणखी वाचा : सर्वांत दिलासादायक बातमी! रशियात कोरोनावरील लसीची मानवी चाचणी यशस्वी