Sat, Aug 08, 2020 11:49



होमपेज › National › कोरोनाचा कहर! गेल्या २४ तासांत २४ हजारहून अधिक रुग्णांची भर

कोरोनाचा कहर! गेल्या २४ तासांत २४ हजारहून अधिक रुग्णांची भर

Last Updated: Jul 05 2020 10:23AM




नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात कोरोना बाधीतांच्या आकड्यात दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. काल दिवसभरात २४ हजार हून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ६१३ जणांचा मृत्यू झाला आहे, पहिल्यांदाच गेल्या २४ तासांत कोरोना बाधितांच्या आकड्याने उच्चांक गाठला आहे. 

आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या चोवीस तासांत २४ हजार ८५० नवे कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील बाधीतांची संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत १९ हजार २६८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

सध्या २ लाख ४४ हजार ८१४ जणांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत देशात ४ लाख ९ हजार ८३ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातही कोरोनाच्या आकड्यात मोठ्याप्रमाणात गुणाकार होत चालला असल्याचे चित्र समोर आले आहे. कालदिवसभरात राज्यात ७ हजार ७४ रूग्णांची भर पडली असून बाधितांचा आकडा २ लाख ६४ वर पोहचला आहे. तर आत्तापर्यंत १ लाख ८० हजार ८२ जण कोरोनामुक्त झाले असून सध्या ८३ हजार २९५ जणांवर उपचार सुरू आहेत.