Wed, Oct 28, 2020 10:30होमपेज › National › चोवीस तासांत कोरोना रुग्णसंख्या ८६ हजार पार

देशात २४ तासांत कोरोना रुग्णसंख्या ८६ हजार पार 

Last Updated: Sep 25 2020 12:14PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतात मागील २४ तासांत कोरोना विषाणूच्या ८६ हजार ५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार १४१ जणांचा मृत्यू झाला. 

देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ५८ लाख १८ हजार ५७१ झाली आहे. यामध्ये ९ लाख ७० हजार ११६ सक्रिय रुग्ण आहेत. ४७ लाख ५६ हजार १६५ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत ९२ हजार २९० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. 

काल (२४ सप्टेंबर) पर्यंत एकूण ६ कोटी ८९ लाख २८ हजार ४४० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामधील १४ लाख ९२ हजार ४०९ कोरोना चाचण्या काल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे. 
 

 "