Fri, Sep 25, 2020 19:47होमपेज › National › कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक! २४ तासांत ९७ हजारांहून अधिक नोंद 

कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक! २४ तासांत ९७ हजारांहून अधिक नोंद 

Last Updated: Sep 17 2020 10:57AM
२४ तासांत ९७ हजार ८९४ कोरोना रुग्णांची नोंद 

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

देशात गेल्या एका दिवसात आतापर्यंतची उच्चांकी कोरोनारुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल ९७ हजार ८९४ नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले. तर १ हजार १३२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने ५१ लाखांचा टप्पा ओलांडत, ५१ लाख १८ हजार २५३ एवढी मजल मारली आहे. दुदैवाने देशात आतापर्यंत ८३ हजार १९८ कोरोनारुग्णांचा (१.६३%) मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी उच्चांकी जवळपास ८२ हजार ७१९ रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णत: बरे झाल्याने त्यांना विविध रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या त्यामुळे ४० लाख २५ हजार ७९ एवढी झाली आहे. तर, १० लाख ९ हजार ९७६ रुग्णांवर (१९.७३%) देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर गुरुवारी ७८.६४ टक्के एवढा नोंदवण्यात आला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाप्रभावित महाराष्ट्रात सर्वाधिक २३ हजार ३६५ कोरोनारुग्णांची भर पडली. महाराष्ट्रासह कर्नाटक (९,७२५), आंधप्रदेश (८,८३५), उत्तर प्रदेश (६,२२९), तामिळनाडू (५,६५२), दिल्ली (४,४७३) तसेच ओडिशामध्ये (४,२७०) सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद घेण्यात आली आहे. देशात गेल्या एका दिवसात ११ लाख ३६ हजार ६१३ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. देशातील एकूण कोरोना तपासण्यांची संख्या त्यामुळे ६ कोटी ५ लाख ६५ हजार ७२८ एवढी झाल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे. देशातील ४८.५% सक्रिय रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंधप्रदेश या तीन राज्यात आहेत. तर, २४.५% टक्के सक्रिय रुग्ण उत्तरप्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगढ, ओडिशा, केरळ तसेच तेलंगणा राज्यात आहेत. 

कोरोनामुक्तीचा वाढता आलेख -
 

    दिनांक       कोरोनामुक्त 

१)  १० सप्टेंबर    ७१,६१३

२) ११ सप्टेंबर     ७२,२१६

३) १२ सप्टेंबर     ७३,८५३

४) १३ सप्टेंबर     ७४,५३३

५) १४ सप्टेंबर     ७५,६६८

६) १५ सप्टेंबर     ७६,४९३

७) १६ सप्टेंबर     ७७,६४५ 

कोरोनामृत्यू सर्वाधिक असलेले राज्य 

    राज्य            कोरोनामृत्यू 

१) महाराष्ट्र         ३०,८८३ (२.८%) 

२) केरळ           ३,२५६   (२.८%)

३) दिल्ली           ४,८३९    (२.१%)

४) पश्चिम बंगाल  ४,१२३    (१.९%) 

५) तामिळनाडू    ८,५५९   (१.६%)

६) कर्नाटक        ७,५३६   (१.६%)

७) उत्तरप्रदेश     ४,६९०    (१.४%) 

 "