Sat, Aug 08, 2020 11:48होमपेज › National › अडवलेल्या जेसीबीनेच विकास दुबेचा किल्ला जमीनदोस्त; अलीशान गाड्यांचाही केला चक्काचूर

अडवलेल्या जेसीबीनेच विकास दुबेचा किल्ला जमीनदोस्त; अलीशान गाड्यांचाही केला चक्काचूर

Last Updated: Jul 04 2020 4:12PM

संग्रहित छायाचित्रकानपूर : पुढारी ऑनलाईन

कानपूर येथील कुख्यात गुंड आणि आठ पोलिसांची दिवसाढवळ्या हत्या करणारा विकास दुबेविरोधात कानपूर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली. पोलिस पथकावर हल्ला झाल्यापासून फरार असलेला विकास दुबेचे घर जेसीबीने पाडण्यात आले आहे. तो हाच जेसीबी आहे ज्यातून विकास दुबेने पोलिसांची दिशाभूल करून हल्ला केला होता. बेकायदेशीरपणे त्याने ताबा मिळवून त्याने घर बांधले होते. चौबेपूर येथील एसओ विनय तिवारी यांना निलंबित करण्यात आले आहे. एसटीएफ त्यांच्याकडे विचारपूस करत होती. 

अधिक वाचा : '८ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा एन्काऊंटर करा' 

विकास दुबेचे किल्लेनुमा घर बिकारू गावात आहे, तेथून त्याने पोलिसांवर गोळीबार केला. विकास दुबेची माहिती देणाऱ्यासाठी पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विकास दुबे आणि त्याच्या टोळीने काल पोलिस पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात यूपी पोलिसमधील 8 पोलिस शहीद झाले. या प्रकरणात आता बरीच महत्वाची माहिती समोर येत आहे. तपासासाठी गठित करण्यात आलेली एसटीएफ कित्येक पोलिसांची सुद्धा चौकशी करत आहे. त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले जाते.

अधिक वाचा : कानपूरमध्ये गुंडांचा हल्ला; ८ पोलिस शहीद

असेही म्हटले जाते की विकास दुबेला चौबेपूर पोलिस स्टेशन किंवा काही विश्वसनीय स्त्रोतांकडून पोलिस आल्याची माहिती मिळाली. याआधी शुक्रवारी बकरू गावात विकासचे घर पोलिसांनी उध्वस्त केले होते. संपूर्ण घर जमीनदोस्त केले होते. 

अधिक वाचा : गँग्स ऑफ कानपूर : कोण आहे हा विकास दुबे ज्यानं उत्तर प्रदेशाला हादरवून सोडलं?