Tue, Sep 29, 2020 09:50होमपेज › National › काँग्रेस खासदारांवर अमित शहा नाराज का झाले?

काँग्रेस खासदारांवर अमित शहा नाराज का झाले?

Last Updated: Dec 09 2019 5:45PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्‍तसेवा

बलात्काराच्या वाढत्या घटनांवर गत आठवड्यात लोकसभेमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या दोन खासदारांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यासमोर येत आक्रळास्तेपणा केला होता. या वर्तनाबद्दल संबंधित खासदारांनी स्मृती ईराणी यांची माफी मागावी, यावर भारतीय जनता पक्ष ठाम असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील लोकसभेत या विषयावर बोलताना नाराजी व्यक्‍त केली. 

संसदेचे आपले एक महत्व असून संसदेची गरिमा कायम राखणे सर्व खासदारांचे कर्तव्य ठरते, असे अमित शहा यांनी शून्य प्रहरात सांगितले. काँग्रेसच्या खासदारांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत केलेल्या वर्तनाबद्दल या पक्षाचे गटनेते अधिररंजन चौधरी यांनी माफी मागितली पाहिजे. नियम ३७४ अंतर्गत टी. एन. प्रतापन आणि डीन कुरियाकस या दोन काँग्रेसी खासदारांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सदनात मांडला जाणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. 

काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरूनही भाजपचे सदस्य उग्र असल्याचे सोमवारी दिसून आले. चौधरी यांना उद्देशून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले की, आपण वरिष्ठ सदस्य आहात. आपल्याला नियमांचीही पुरेपूर माहिती आहे. त्यामुळे वादग्रस्त विधान मागे घ्यावे. यावर चौधरी यांनी आपण कोणत्याही नियमांचे उल्‍लंघन केलेले नाही. भाजपच्या सदस्यांनी वारंवार मला भीती घालण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही मला भीती घालू शकत नाही, असे सांगितले. 
 

 "