Sun, Sep 20, 2020 10:46होमपेज › National › दिल्लीतील झोपडपट्टीत भीषण आग 

दिल्लीतील झोपडपट्टीत भीषण आग 

Last Updated: May 26 2020 8:12AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

दक्षिण - पूर्वी दिल्लीतील तुघलकाबाद येथील झोपडपट्टीत आज ( दि. २६ ) मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत हजारो झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. दक्षिण - पूर्व दिल्लीचे डीसीपी राजेंद्र प्रसाद मीना यांनी आग विझवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु केले आहे आणि आतापर्यंत तरी कोणत्याही जीवित हाणी झाली नसल्याचे सांगितले. 

डीसीपी राजेंद्र प्रसाद मीना म्हणाले की, 'तुघलकाबाद भागातील झोपडपट्टीत आग लागल्याची माहिती आम्हाला मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर सगळे पोलिस कर्मचारी तेथे लगेच पोहचले. जवळपास १००० ते १२०० झोपड्यांना आग लागली होती.' ते पुढे म्हणाले की 'स्थानिक लोकांनी सांगितले की ज्यावेळी आग लागली त्यावेळी ते आपल्या झोपड्यातून लगेचच बाहेर आले होते. पण, मोठ्या प्रमाणात आग लागल्याने त्यांनी कोण अडकले आहे का हे पाहिले नाही.' सध्या आग विझवण्याचे काम सुरु असून अजून पर्यंत कोणतीही जीवित हाणी झालेली नाही. 

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्या सांगितल्यानुसार त्यांना या आगीची माहिती १२.१५ मिनिटांनी मिळाली होती. त्यानंतर लगेचच ३० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

 "