Fri, Oct 02, 2020 00:02होमपेज › National › ड्रग्ज पार्टीचे आयोजन; करण जोहर विरोधात तक्रार

ड्रग्ज पार्टीचे आयोजन; करण जोहर विरोधात तक्रार

Last Updated: Sep 17 2020 8:29AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

चित्रपट निर्माता करण जोहर यांनी  ड्रग्ज पार्टीचे आयोजन केल्याची तक्रार  माजी आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी दाखल केली आहे. करण जोहर यांनी गेल्यावर्षी आपल्या घरात या पार्टीचे आयोजन केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

या पार्टीमध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा यांसारख्या अनेक  कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये अमली पदार्थांचे सेवन करण्यात आले होते, असा आरोप  मनजिंदर सिंह यांनी केला आहे. या कलाकारांची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी अमली पदार्थ विरोधी पथकाकडे (एनसीबी)  केली आहे. दरम्यान,  गेल्या वर्षी या पार्टीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मनजिंदर सिंह यांनी ट्विटरद्वारे या तक्रारीची माहिती  दिली आहे. मी करण जोहर यांच्या विरोधात ड्रग्ज पार्टीचे आयोजन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधील सर्व कलाकारांची चौकशी केली जावी, अशी विनंती केली असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 

 "