Tue, Sep 29, 2020 20:15होमपेज › National › प्राप्ती कर परतावा भरण्यासाठी मुदतवाढ

प्राप्ती कर परतावा भरण्यासाठी मुदतवाढ

Last Updated: Jul 05 2020 4:28PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना महारोगराईच्या पार्श्वभूमीवर असंख्य करदात्यांना प्राप्तीकर विभागाने मोठा दिलासा दिला आहे. चालू आर्थिक वर्ष२०१९-२० साठी प्राप्ती कर परतावा (आयटीआर) भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आता करदात्यांना ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत आयटीआर भरता येईल.

कोरोना संकटामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. टीडीएस, सीएस विवरण पत्र जमा करण्यास ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ जुलै २०२० पर्यंत आता करदात्यांना टीडीएस, टीसीएस जमा करता येईल. या सोबत टीडीएस,  टीसीएस विवरण पत्र जारी करण्याची तारीख १५ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

कर सवलतीसाठी ३१ जुलैपर्यंत करता येईल गुंतवणूक

कर बचतीसाठी प्राप्ती कराच्या कलम ८० सी, ८० डी तसेच ८० ईअंतर्गत गुंतवणूक करण्याची मुदत ३० जुन पर्यंतने वाढवून ३१ जुलैपर्यंत करण्यात आली आहे. अश्यात कर सवलती मिळवू इच्छिणाऱ्यांना ३० जुलैपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा मिळाली आहे. प्राप्तीकर विभागाने नवीन आयटीआर अर्ज जारी केले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) आर्थिक वर्षातील परतावा अर्जाच्या नमुण्यात संशोधन केले आहे. 

३१ जुलैपासून मिळणार फॉर्म-१६ प्राप्ती कर परताव्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून फॉर्म-१६ मे महिन्यापर्यंत मिळून जातो. पंरतु, यंदा कोरोना संकटामुळे सरकारने फॉर्म-१६जारी करण्याची तारीखच ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे. हा अर्ज एक प्रकारे टीडीएस प्रमाणपत्र आहे. आयटीआर भरतांना हा अर्ज आवश्यक असतो. या सोबतच केंद्र सरकारने पॅन कार्डला आधार सोबत लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च ठेवली होती. पंरतू, देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्याने ही मुदत ३० जून २०२० पर्यंत पुढे वाढवण्यात आली होती. यंदा या तारखेत पुन्हा वाढ करीत ती ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

 "