Thu, Oct 01, 2020 18:40होमपेज › National › राहुल गांधींना 'त्‍या' वक्‍तव्‍यावरुन निवडणूक आयोगाची नोटीस  

राहुल गांधींना 'त्‍या' वक्‍तव्‍यावरुन निवडणूक आयोगाची नोटीस  

Last Updated: Dec 16 2019 9:40AM

राहुल गांधीनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

भाजप नेत्‍या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. 'रेप इन इंडिया' या वक्तव्यावर राहुल गांधी यांच्याकडून निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण मागितले आहे. 

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये प्रचारसभेदरम्यान 'रेप इन इंडिया' असे वक्‍तव्‍य केले होते. याचे पडसाद संसदेतही उमटले होते. सत्‍ताधारी भाजपच्या खासदारांनी राहुल गांधी यांच्या माफीची मागणी करीत लोकसभेत प्रचंड गदारोळ घातला होता. राहुल गांधी बलात्काराला प्रोत्साहन देत असल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला होता. यानंतर याबाबत स्‍मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. 

भाजपकडून राहुल गांधी यांनी त्‍या विधानावरुन माफी मागावी अशी मागणी होत आहे. मात्र दिल्‍लीतील 'भारत बचाओ रॅलीत' राहुल गांधी यांनी मी मरून जाईन, पण माफी मागणार नाही. तसेच माझे नाव राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे, असे म्‍हणत माफी मागण्‍यास नकार दिला आहे. आता राहुल गांधी यांच्‍या सावरकरांच्‍या विधानावरुन भाजप व काँग्रेसमध्‍ये जुंपली आहे. 

 "