Thu, Oct 01, 2020 17:22होमपेज › National › ईडीची टीम तिसऱ्यांदा अहमद पटेल यांच्या घरी

ईडीची टीम तिसऱ्यांदा अहमद पटेल यांच्या घरी

Last Updated: Jul 02 2020 2:30PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

संदेसरा घोटाळाप्रकरणी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची टीम पुन्हा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचली. एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा ईडीची टीम पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचली. तीन अधिकाऱ्यांचे पथक पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीने याप्रकरणी पहिल्यांदा २७ जूनला आणि ३० जूनला पटेल यांची चौकशी केली होती. ज्येष्ठ नागरिक आणि कोविड-१९ च्या नियमावलीमुळे ते चौकशीसाठी येऊ शकणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. नंतर ईडीचे आपले एक पथक पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी पटेल यांची साडेआठ तास चौकशी केली होती.

संदेसरा बंधूंनी भारतीय बँकांचे कोटींचे पैसे बुडवले आहेत, असे स्पष्ट झाले आहे. 
 

 "