Fri, Sep 25, 2020 18:21होमपेज › National › गेहलोत सरकारने राजस्थानमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला!

गेहलोत सरकारने राजस्थानमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला!

Last Updated: Aug 14 2020 4:27PM

संग्रहित छायाचित्रजयपूर : पुढारी ऑनलाईन

राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव  जिंकला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारवरील संकट टळले आहे.  माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे बंड थंड करण्यात यश आल्याने काँग्रेस सरकार स्थिर झालं आहे. 

अधिक वाचा : सचिन पायलटांची नवीन आसन व्यवस्था विरोधी बाकांजवळ, पायलट म्हणाले....

राजस्थानातील गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली राजकीय अस्थिरता संपवत माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची गळाभेट झाली. त्यामुळे बंडखोरीच्या विस्तवावर पाणी पडले असा विचार सर्वजण करत असतानाच अजून त्या विस्तवातून धूर निघत आहे असे आज (दि.14) विधानसभा सत्राच्या पहिल्याच दिवशी दिसून आले. 

अधिक वाचा : जगातील चौथे अब्जाधीश असलेल्या मुकेश अंबानींच्या संपत्तीचे 'हे' असणार वारसदार!

राजस्थान विधानसभेच्या गेल्या सत्रात तत्कालीन उपमख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आजूबाजूला बसत होते. पण, आजपूसन सुरु झालेल्या विधानसभा सत्रात सचिन पायलट यांची जागा बदलण्यात आली आहे. त्यांची जागा विरोध पक्षांच्या आसन व्यवस्थेच्या अगदी जवळ ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ सचिन पायलट यांची आसनव्यवस्था ही सत्ताधारी पक्षाच्या अत्यंत काठावर करण्यात आली आहे. 

अधिक वाचा : हॉटेल बिले, वैद्यकीय विमा प्रीमियम, लाखापेक्षा जास्त शाळेची फी सुद्धा आता आयकर खात्याच्या रडारवर!

 "