Mon, Nov 30, 2020 13:14होमपेज › National › पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Last Updated: Jul 08 2020 5:19PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी शिक्कामोर्तब केले. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू करण्यात आली होती.

अधिक वाचा : कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानकडून नवी खेळी?

योजनेअंतर्गत पहिल्या तीन महिन्यात १ कोटी २० लाख टन धान्याचे वाटप करण्यात आले होते. तर आगामी पाच महिन्यात २ कोटी ३ लाख टन मोफत धान्य वाटप केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली. 

अधिक वाचा : मानवी तस्करी करणाऱ्या दोघांना तेलंगणात अटक, मुंबईच्या २ मुलींची सुटका

मोफत अन्न धान्य योजनेनुसार प्रती व्यक्ती ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रती कुटुंब ३ किलो डाळ दिले जाणार आहे. एकूण ८ महिन्याच्या काळात राबविल्या जाणाऱ्या या योजनेवर सुमारे दीड लाख कोटी रुपये खर्च होणार असून ८१ कोटी लोकांना सदर योजनेचा लाभ होणार असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले. प्रवासी मजुरांनादेखील येत्या ऑगस्टपर्यंत या योजनेचा फायदा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अधिक वाचा : बीएसएनएल,एमटीएनएलच्या मालमत्ता विक्री प्रक्रियेला वेग, ३७ हजार कोटींची संपत्ती विकणार