Wed, Jun 23, 2021 01:03
बिहार सरकारने लपवले कोरोना मृतांचे आकडे! मागील तीन दिवसांत ९ हजार ३७५ जणांचा मृत्‍यू 

Last Updated: Jun 10 2021 10:28AM

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन: सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाच्‍या नव्‍या रुग्‍णांची संख्‍या एक लाखांपेक्षा कमी नोंदवली गेली. ही दिलासादायक बाब असतानाच अचानक मागील २४ तासांमध्‍ये कोरोना रुग्‍णांच्‍या आकडेवारी अचानक वाढ झाली. तब्‍बल ६ हजार १४८ रुग्‍णांचा मृत्‍यू  झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना मृतांचा हा आकडा सर्वासामान्‍यांमध्‍ये दहशत वाढविणारा ठरला आहे. बिहार सरकार मृतांचा आकडा लपवला. वस्‍तुनिष्‍ठ आकडेवारी दिलीच नाही. बिहारने मागील २४ तासात दिलेली आकडवारीमुळे राज्‍यातील मृतांच्‍या संख्‍येत ७३ टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली आहे. याच आकडेवारीमुळे देशातील कोरोना मृतांच्‍या संख्‍येत मोठी वाढ दिसून आली.  

अधिक वाचा : देशात गेल्या २४ तासात तब्बल ६ हजार १४८ जणांचा कोरोनाने बळी

बिहार सरकार कोरोना रुग्‍णांच्‍या मृत्‍यूची वस्‍तुनिष्‍ठ माहितीच देत नसल्‍याचा दावा मागील महिन्‍यापासून केला जात होता. मृतांच्‍या आकड्यावरुन पाटणा उच्‍च न्‍यायालयानेही राज्‍य सरकारला पटकारले होते. बक्‍सरमधील गंगा नदीत आढळणारे मृतदेह असो की स्‍मशानभूमीत होणारे अत्‍यंसंस्‍कार, याबाबत सरकारने दिलेली आकडेवारी संभ्रमात टाकणारीच होती. आता बिहारमधील नितीशकुमार  सरकारने खरी माहिती दिल्‍याने देशातील कोरोना रुग्‍ण मृतांचा  आकडा अचानक वाढला आहे. 

अधिक वाचा : रेमडेसिव्हीर, स्टेरॉइड देऊ नये! कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

बिहारमधील आरोग्‍य सचिव प्रत्‍यय अमृत यांनी बुधवारी राज्‍यात कोरोनामुळे एकुण ५४२४ जणांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती दिली होती.ही आकडेवारी जुनीच होती. यानंतर ७ जूनपर्यंत राज्‍यात ९ हजार ३७५ रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याचे सरकारनेच जाहीर केले.त्‍यामुळे मृतांचा आकडा वाढला. १८ मे रोजी बिहार सरकारने वस्‍तुनिष्‍ठ आकडेवारीची माहिती घेण्‍यासाठी एक समिती नियुक्‍ती केली. या समितीने दिलेल्‍या अहवालात आकडेवारीतील माहिती चुकीचे असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते. 

अधिक वाचा :कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतले तरी डेल्टा व्हेरियंटची लागण होतेच 

कोरोना रुग्‍णांचा मृत्‍यू ,अशा संवेदनशील विषयावर सरकारी पातळीवर अत्‍यंत असंवेदनशीलपणे कारवाई झाली. याप्रकरणातील दोषीवर करावाई केली जाईल, असे आरोग्‍य सचिव प्रत्‍यय अमृत यांनी सांगितले. तसेच कोरोना संसर्ग झाल्‍यानंतर घरीच उपचार घेणार्‍या रुग्‍णांच्‍या मृत्‍यूनंतर याची नोंदची झाली नाही.  काहींचा मृत्‍यू कोरोनातून पूर्ण बरे झाल्‍यानंतर झाला आहे.  तसेच काहींना संसर्ग झाल्‍यानंतर दुसर्‍या जिल्‍ह्यात उपचार सूरु असताना मृत्‍यू झाल्‍याने सरकारला मृतांच्‍या आकड्याची वस्‍तुनिष्‍ठ माहिती मिळण्‍यास अडचणी आल्‍या, अशी सारवासारवही त्‍यांनी केली.