Wed, Jun 23, 2021 02:49होमपेज › National › चंबळ नदी पार करताना राजस्थानात बोट उलटली; १४ बुडाल्याची भिती

चंबळ नदीत बोट उलटून १४ बुडाल्याची भिती

Last Updated: Sep 16 2020 12:35PM
कोटा (राजस्थान) : पुढारी ऑनलाईन  

बुंडी जिल्ह्याच्या सीमेनजीक गोठडा कला गावाजवळ मोठा अपघात झाला आहे. चंबळ नदीत बोट बुडाली असून त्यामध्ये महिला आणि मुलांसह ५० हून अधिक लोक असल्याची माहिती आहे. लोकांव्यतिरिक्त गावकऱ्यांच्या मोटारसायकलीही नावेत ठेवण्यात आल्या. या अपघातात अनेक लोक नदीत बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, १४ लोक बुडाल्याची भिती आहे. 

घटनास्थळी बचाव दल पोहोचले असून आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह बाहेर काढले गेले आहेत. घटनास्थळी मोठ्या संख्येने गावकरी पोहोचले आणि त्यांच्या पातळीवर बचाव आणि मदतकार्यात सहभागी झाले आहेत. पोलिस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच बचाव व मदत पथकेही कोटा येथून रवाना झाली आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. लोकसभा सभापतींचे कार्यालय जिल्हा प्रशासनाशी सतत संपर्कात आहे. जिल्हाधिकारी व एसपी यांनी अपघाताची माहिती घेऊन घटनास्थळी रवाना झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बोट अचानक असंतूलित होऊन पाणी भरण्यास सुरवात झाली. बोट बुडालेली पाहून काही लोकांनी नदीत उडी मारली, त्यानंतर बोटही पाण्यात बुडली. ज्यांना पोहता येत होते ते पोहून नदीतून बाहेर आले. किती लोक नदीत बुडले आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी शेकडो गावकरी आहेत, युद्धपातळीवर लोकांचा शोध घेतला जात आहे.