Sat, Aug 15, 2020 16:51होमपेज › National › केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

Last Updated: Aug 02 2020 5:27PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटात गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. स्वत: अमित शहा यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. अमित शहा यांनी ट्वीट केले की, 'कोरोनाची सुरुवातीची लक्षणे पाहून, माझी चाचणी झाली आणि अहवाल सकारात्मक आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे. गेल्या काही दिवसात माझ्याशी संपर्क साधलेल्यांनी दक्षता घेवून वेळीच चाचणी करून घ्यावी असे अवाहन त्यांनी केले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून भारतात प्रतिदिनी ५० हजाराच्या वर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा हा वाढता आलेख देशाची चिंता वाढवणारा ठरत आहे. परंतु, आज मिळालेल्या आकडेवारीनुसार मागच्या २४ तासात ५४ हजार ७३६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असले तरी गेल्या २४ तासातच ५० हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. देशात २४ तासात ५० तब्बल हजार कोरोना रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच घटना आहे. 

गेल्या २४ तासात देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ८५३ इतकी आहे.  दरम्यान, भारताने १७  लाखांचा कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १७ लाख ५० हजार ७२७ वर गेली आहे.  तर देशातील ११ लाख ४५ हजार ६३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे असे  आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.