Thu, Jan 28, 2021 03:58होमपेज › National › राहुल गांधींनी पीएम मोदींना मारलेल्या 'त्या' टोमण्यावर गर्दीतून तुफान प्रतिसाद 

राहुल गांधींनी पीएम मोदींना मारलेल्या 'त्या' टोमण्यावर गर्दीतून तुफान प्रतिसाद 

Last Updated: Oct 28 2020 8:41PM

राहुल गांधीपाटणा : पुढारी ऑनलाईन

बिहारमधील पश्चिम चंपारण्यमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रचार रॅली दरम्यान आपले भाषण थांबविण्याची वेळ आली. त्याला कारणही तसेच होते. प्रचार रॅली दरम्यान राहुल गांधी यांना गर्दीतील एका व्यक्तीचे म्हणणे ऐकावे लागले. त्याचबरोबर त्या व्यक्तीला उत्तरही द्यावे लागले.

राहुल गांधी प्रचार सभेत संबोधित करताना म्हणाले की, आपल्याला खोटे बोलता येत नाही ही आमच्या लोकांची समस्या आहे. याच दरम्यान गर्दीतील एका व्यक्तीचा आवाज आला. मात्र, त्याकडे राहुल गांधी यांनी दुर्लक्ष केले आणि आपले भाषण सुरुच ठेवले. ते पुढे म्हणाले की, 'त्यांच्यासमोर आम्ही खोट बोलण्यात त्यांचा हात धरु शकत नाही आणि ही माझ्यामधील उणीव मी स्वीकारतो.' याचवेळी गर्दीतून एक आवाज आला...'सर, ते म्हणतात, पकोडा तळा पकोडा...'

राहुल गांधी यांना हे एेकून हसू आले आणि गर्दीतल्या त्या व्यक्तीला प्रश्न केला की, 'तुम्ही बनवला का कधी पकोडा? जेव्हा मोदीजी आणि नितीशकुमार येतील तेव्हा त्यांना थोडासा पकोडा खाऊ घाला'. राहुल गांधींच्या या फिरकीने गर्दीत एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

याआधी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा प्रचारदरम्यान बोलताना अनेकवेळा संयम सुटल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात एका व्यक्तीने त्यांच्या रॅलीत लालू यादव जिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी नितीशकुमार त्या व्यक्तीवर ओरडले होते. बंद करा हा मूर्खपणा, असे म्हणत त्यांनी त्या व्यक्तीला गर्दीतून हात वर करण्यास सांगितले होते.