होमपेज › National › देशात २४ तासांत ४१८ जणांचा कोरोनाने मृत्यू

देशात २४ तासांत ४१८ जणांचा कोरोनाने मृत्यू

Last Updated: Jun 30 2020 11:23AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतात मागील २४ तासांत कोरोनाने ४१८ जणांचा मृत्यू झाला आहे. १८,५२२ नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून आता देशात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची एकूण संख्या ५,६६,८४० झाली आहे. देशात सक्रिय रूग्णांची संख्या २,१५,१२५ वर पोहोचली असून आतापर्यंत ३,३४,८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या १६,८९३ वर पोहोचली आहे.

सँपल टेस्ट  

२९ जूनपर्यंत एकूण ८६,०८,६५४ सँपल टेस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये २,१०,२९२ सँपल टेस्ट काल करण्यात आले आहे, अशी माहिती आयसीएमआरकडून (ICMR) देण्यात आली आहे. 

बीएसएफचे ५३ जवान पॉझिटिव्ह 

मागील २४ तासांत सीमा सुरक्षा दलाच्या आणखी ५३ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चारजण कोरोनामुक्त झाले आहेत. बीएसएफमध्ये सक्रिय रूग्णांची संख्या ३५४ आहे. तर आतापर्यंत ६५९ जवान कोरोनामुक्त झाले आहेत.