Wed, May 19, 2021 05:46
आंध्रात 15 पट घातक स्ट्रेन

Last Updated: May 04 2021 10:59PM

अमरावती (आंध्र प्रदेश) :

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गर्भगळीत झालेल्या देशाकरिता दुष्काळातील तेराव्या महिन्यासारखी एक बातमी आहे. आंध्र प्रदेशात कोरोनाचा एक नवाच स्ट्रेन आढळलेला आहे. संसर्ग झाल्यानंतर तिसर्‍या-चौथ्या दिवशीच रुग्णाच्या ऑक्सिजन पातळीवर हा स्ट्रेन गंभीर परिणाम करतो. त्याला ‘एपी स्ट्रेन’ तसेच ‘एन 440 के’ असे नाव देण्यात आले आहे. हा नवा स्ट्रेन सध्याच्या स्ट्रेनपेक्षा 15 पट घाटक आहे.

‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी’तील तज्ज्ञांच्या मते, हा नवा स्ट्रेन विषाणूच्या विद्यमान स्वरूपांपेक्षा पंधरा पटींनी अधिक घातक आहे. या नव्या स्ट्रेनची ओळख राज्यातील कुर्नूलमध्ये पहिल्यांदा पटली. संक्रमणानंतर तीन-चारच दिवसांनी रुग्ण हायपोक्सिया किंवा डिस्पनियाचे बळी ठरतात. म्हणजेच रुग्णाच्या फुफ्फुसापर्यंत श्वास पोहोचणे बंद होते. वेळेवर उपचार व ऑक्सिजन सपोर्ट मिळाला नाही, तर रुग्णाचा मृत्यू ठरलेला आहे. भारतात सध्या याच कारणांनी बहुतांश रुग्णांवर मृत्यू ओढवत आहे. 

तरुणांसह मुलांसाठीही घातक

हा नवा स्ट्रेन तरुणांसह लहान मुलांसाठीही घातक ठरत आहे. वेळेत त्याची चेन तोडली न गेल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. हा स्ट्रेन ‘बी 1617’ आणि ‘बी 117’हून किती तरी पटीने घातक आहे.

‘एपी स्ट्रेन’ची वैशिष्ट्ये

*    सर्वसामान्यांत हा स्ट्रेन कोरोनाच्या इतर स्ट्रेनच्या तुलनेत फार वेगाने संक्रमित होतो.  
* उत्तम रोगप्रतिबंधक क्षमता असलेले लोकही या स्ट्रेनसमोर हतबल होताना आढळत आहेत.