Thu, Oct 29, 2020 08:13होमपेज › National › कोरोना: देशात गेल्या २४ तासांत १,१३३ रुग्णांचा मृत्यू

देशात गेल्या २४ तासांत १,१३३ रुग्णांचा मृत्यू

Last Updated: Sep 20 2020 10:44AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 
जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तर भारतातही करोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५४ लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९२ हजार ६०५ नवीन करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत तर एक हजार १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत सहा कोटी ३६ लाख ६१ हजार ६० करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शनिवारी १२ लाख ६ हजार ८०६ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. करोना चाचण्या वाढवल्यामुळे रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे, असे सांगण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५४ लाख ४४ इतकी झाली आहे. यापैकी १० लाख १० हजार ८२४ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. तर ८६ हजार ७५२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्केंच्या जवळ पोहचले आहे. देशात आतापर्यंत ४३ लाख ३ हजार ४४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
 

 "