Wed, May 19, 2021 06:08
पीएम केअर फंडात जमा झालेल्या पैशाचा तपशील सादर करा; १०० माजी निवृत्त अधिकाऱ्यांचे पीएम मोदींना पत्र

Last Updated: Jan 17 2021 10:25AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पीएम केअर फंडावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संसदेतही आवाज उठवण्यात आला. दरम्यान पीएम केअर फंडच्या (pm care fund) पारदर्शकेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत १०० माजी सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहिले आहे. (100 former bureaucrats raised questions about transparency in pm cares fund)

पीएम केअर फंडात जमा झालेल्या पैशाचा तपशील आणि खर्च सार्वजनीक रित्या खुला करावा. यामुळे कोणत्याही व्यक्तीला याबाबत साशंकता राहणार नाही. अशा आशयाचे पत्र लिहून १०० माजी अधिकाऱ्यांनी पीएम केअर फंडावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

अधिक वाचा : 'या' आहेत देशातील टॉप ५ इलेक्‍ट्रिक कार!

माजी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, या पत्रात पीएम केअर फंडाबाबत मागच्या काही काळापासून काहींनी आक्षेप घेतला यावर आम्ही नजर ठेवून आहोत. हा फंड कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी लोकांना मदत म्हणून उभारण्यात आला होता. ज्या उद्देशासाठी हा फंड उभा केला होता त्यासाठी हा फंड वापरला गेला का याबाबत अजूनही माहिती जनतेसमोर मांडली नसल्याने सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. 

अधिक वाचा : सोशल मीडियासाठी डेटा प्राेटेक्शन कायदाच हवा !

पीएम फंडाच्या बाबतीतील सर्व गोष्टींची माहीती पारर्शकपणे मांडून पंतप्रधानांनी आपली प्रतिष्ठा कायम ठेवावी असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर आयएएस अधिकारी अनिता अग्निहोत्री, एसपी एंब्रोसे, शरद बेहर, सज्जाद हसन, हर्ष मंदर, पी जॉय ओमेन, अरुणा रॉय, मधु भदुडी, केपी फाबियान, देव मुखर्जी, सुजाता सिंह, याचबरोबर माजी आयपीएस अधिकारी एएस दुलत, पीजीजे नंबूदरी, जूलीयो रिबेरो यांच्यासह अन्य जणांचे हस्ताक्षर आहेत. 

अधिक वाचा : हो ! भारतात जगातील सर्वांत मोठे लसीकरण

कोरोनाचा प्रादुर्भावानंतर केंद्र सरकारने कोरोनोकाळात लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठी स्वतंत्र पीएम केअर फंड निर्माण केला होता. या फंडात जमा केला जाणारा पैशाला आयकर माफ करण्यात आला होता. त्यामुळे विरोधकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. संसदेतही यावरून बराच गदारोळ झाला होता. आता सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांनीच फंडाच्या पारदर्शकतेवर सवाल केले आहेत.